नाशिक : राष्ट्रीय परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या यूजीसी -नेट २०२० परीक्षे निकाल जाहीर करण्यात आले असून, परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांना https //ugcnet.nta.nic.in संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
या परीक्षेत देशभरातून सहायक अध्यापक व कनिष्ठ शोध अध्यापक तथा सहायक अध्यापक पदासाठी एकूण ४२ हजार ३०९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
राष्ट्रीय परीक्षा परिषदेतर्फे २४ सप्टेंबर ते १३ नोव्हेंबर या १२ दिवसांच्या कालावधीत देशभरातीस २२५ शहरांमध्ये १११९ केंद्रांवर रोज दोन सत्रांमध्ये तब्बल ८१ विषयांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यात सहायक प्राध्यापक पदासाठी नोंदणी केलेल्या दोन लाख ५९ हजार ७३४ विद्यार्थ्यांपैकी १४ लाख ४७९ विद्यार्थ्यांनी सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा दिली होती. त्यातील ४ हजार ८४८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत, तर कनिष्ठ शोथ प्राध्यापक तथा सहायक प्राध्यापक पदासाठी नोंदणी केलेल्या ६ लाख १ हजार २४२ पैकी ३ लाख ८६ हजार २२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ३६ हजार १३८ सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले असून, ६ हजार १७१ विद्यार्थी कनिष्ठ शोथ प्राध्यापक व सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, दोन्ही गटांमधून एकूण ४० हजार ९८६ विद्यार्थी सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत.