नाशिक : महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणुकीसाठी १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ. अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचे नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद विभागीय केंद्रावरदेखील अर्ज जमा करण्याची सोय करण्यात आली होती. प्राप्त अर्जांची विद्यापीठ मुख्यालयात दि. ११ रोजी छाननी करण्यात येणार आहे. छाननी उपरांत उमेदवारांच्या वैध अर्जांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मुदत दि. २० सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. निवडणुकीकरिता उमेदवारांची अंतिम यादी दि. २१ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक दि. २८ रोजी तर मतमोजणी दि. ३० रोजी विद्यापीठ मुख्यालयात करण्यात होणार आहे.
आरोग्य विद्यापीठ : प्राधिकरण मंडळासाठी १५१ उमेदवारी अर्ज; ११ रोजी होणार छाननी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 10:29 PM
नाशिक : महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणुकीसाठी १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ. अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचे नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद विभागीय ...
ठळक मुद्देनिवडणूक दि. २८ रोजी मतमोजणी दि. ३० रोजी