शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

अन्यायकारक घरपट्टीवाढीबाबत संभ्रम

By admin | Published: February 21, 2016 10:20 PM

येवला : अपिलीय समिती स्थापन करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

दत्ता महाले येवलायेवला नगरपालिकेने शहरातील १९९४ पूर्वीच्या इमारतींना वार्षिक भाडे अंदाजी आकारून तर सन १९९४ नंतरच्या इमारतींना भांडवलीमूल्यावर आधारित कर आकारणी न करता चौरस मीटरप्रमाणे घरगुती आणि वाणिज्य वापरासाठीच्या कर दरानुसार घरपट्टी आकारली आहे. पालिका मार्चअखेर१०० टक्के वसुलीचा फंडा वापरत असली तरी शहरवासीयांना ही घरपट्टीवाढ अन्यायकारक वाटत आहे. घरपट्टीबाबत नगर परिषद आणि भारतीय जनता पक्षाच्या तू तू मै मैच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.याविरोधात केवळ तीस टक्के घरपट्टी भरून या प्रकरणी अपिलीय समितीकडे दाद मागणार असल्याची भूमिका काही नागरिकांनी घेतली आहे. दरम्यान, पालिकेने या प्रकरणी अपिलीय समितीचे गठन व्हावी म्हणून, जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला आहे. या समितीच्या गठणानंतर, काही अशी घरपट्टी कमी होईल या आशेवर शहरवासीय आहेत.नगरपरिषदेला कायद्यानुसार चार वर्षांनी मालमत्ता करामध्ये सुधारणा करावी लागते. त्यानुसार सुधारणा होणे अपेक्षति होते. परंतु त्यावेळी भांडवली मूल्यावर कर आकारणी जाचक स्वरु पाची असल्याने ती रद्द करून प्रचिलत पद्धतीनुसार वाढ करण्यास पालिकेने मंजुरी दिली होती. यानुसार सन २०१५-१६ मध्ये सुधारणा करण्यात येऊन २५ ते ४० टक्के पर्यत घरपट्टीत वाढ केली आहे.शहर हद्दीतील १२ हजार घर,जागा,व स्थावर मालमत्ता यांचे भोगवाटदार,व घर मालक यांनी पैकी केवळ२५० नागरिकांनी या वाढीबाबत मुख्याधिकारी यांचेकडे दाद मागितली आहे.नगरपरिषदेने घर पट्टी आकारणी करून त्यावर बर्याच घरमालक नागरिकांनी लेखी व तोंडी अपील दाखल केलेले असतानाही, बदल झालेला नाही. मनमाड नगरपरिषदेचा अंतिम चतुर्थ वार्षिक कर आकारणी नुकतीच झालेली असुन त्यांनी जुन्या इमारतीवर वार्षिक भाडे अंदाजावर वाढ केली तर नवीन बांधकामावर भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारली आहे.येवले न.पा. ने केलेली वाढ ही अवास्तव असल्याचा पवित्र भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. पालिकेने नागरिकांना यावाढीवर हरकतीसाठी पर्याय उपलब्ध करून दिला होता. नागरिकांनी घरपट्टीसाठी ३० टक्के रक्कम जरी पालिकेत भरली तरी शासनाचे सोफ्टवेअर उर्वरित रक्कम थकबाकी असल्याचे दाखवत आहे. अवास्तव केलेली वाढ काही अंशी कमी करून सर्वच जनतेला दिलासा द्यावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या आकारणीत मागील वर्षाचा फरक वसूल करताना कमी होणारी रक्कम ही पुढील वर्षासाठी आगावू जमा करण्यात यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.