शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

मांजर आडवे गेल्याचा अपशकुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 1:34 AM

दुपारच्या वेळी एका प्रमुख पक्षाचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी येण्यापूर्वी त्याचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्याचदरम्यान एक मांजर आडवे गेल्याने आपल्या नेत्यासाठी हे अशुभ ठरायला नको. अशी त्यांच्यात चर्चा रंगली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासून एकेक उमेदवार समर्थकांसह दाखल होत अर्ज भरू लागला. दुपारच्या वेळी एका प्रमुख पक्षाचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी येण्यापूर्वी त्याचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्याचदरम्यान एक मांजर आडवे गेल्याने आपल्या नेत्यासाठी हे अशुभ ठरायला नको. अशी त्यांच्यात चर्चा रंगली. त्यामुळे आपला उमेदवार येण्यापूर्वी कुणी प्रतिस्पर्धी आल्यास बरे होईल, अशा चर्चेलादेखील बहर आला. त्याचवेळी एक अपक्ष उमेदवार अर्ज भरण्यासाठी तो रस्ता ओलांडून आल्याने अखेर कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. चला आपल्यावरचे विघ्न टळले, असे म्हणत त्यांनी नेत्याच्या अर्जाच्या तांत्रिक प्रक्रियेची पूर्तता केली.काल राजीनामे देण्याची भाषा, आज...बाळासाहेब सानप यांना भाजपकडून उमेदवारी दिली जात नसल्याबाबत त्यांच्या कार्यालयात जाऊन अनेक नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी राजीनामा देण्याची भाषा गुरुवारपर्यंत करीत होते. मात्र, शुक्रवारी सकाळी भाजपने त्यांची उमेदवारी राहुल ढिकले यांना जाहीर केली. त्यानंतर आदल्या दिवशी राजीनाम्याचीभाषा करणारे सर्व पदाधिकारी आणि संबंधित नगरसेवक हे ढिकले यांच्यासमवेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित झाल्याने ही पक्षनिष्ठा की पदबचाव अशीच चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.फोन मला तरी कुठे आला?उमेदवार अर्ज भरण्यापूर्वी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना संपर्क साधून अर्ज भरण्यासाठी येण्याची विनंती करतो. तसेच उमेदवारांच्या कार्यालयातूनही स्वपक्ष आणि आघाडी किंवा युतीच्या पक्षातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना फोन करून निमंत्रित करण्याची प्रथा आहे. मात्र, भाजपाचा उमेदवारच ऐनवेळी ठरल्याने भाजपच्या प्रमुख पदाधिकाºयांना किंवा शिवसेनेच्या नेत्यांनाही निमंत्रण दिले गेले नसल्याचीच चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रंगली. एक पदाधिकारी दुसºयाला फोन करुन मला पण आताच बाहेरून कळल्याचे सांगत होता. पण मला फोन आलेला नाही, मी कशाला येऊ, असा स्वर पलीकडच्या पदाधिकाºयाने काढताच मला तरी कुठे निमंत्रण मिळालंय? असा सवाल करीत आपण समदु:खी असल्याचे सांगताच त्या घोळक्यातील सगळ्यांनीच त्याच्या सुरात सूर मिसळला.चर्चा ए व बी फॉर्मची...राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारी करण्यासाठी पक्षाचा ए व बी फॉर्म नामांकनासोबत जोडणे आवश्यक असल्याने शुक्रवारी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ए व बी फॉर्मची दिवसभर जोरदार चर्चा होती. ऐनवेळी पक्षात आलेले भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली, परंतु त्यासाठी ए व बी फॉर्म कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला. तसाच प्रकार पश्चिम मतदारसंघातील उमेदवार अपूर्व हिरे यांच्याबाबतही घडला. राष्ट्रवादीने या मतदारसंघात माकपला पाठिंबा दिल्याचे यापूर्वीच जाहीर केले असताना अपूर्व हिरे यांनीदेखील आपल्याकडे राष्ट्रवादीचा ए व बी फॉर्म असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पक्षाने मोजकेच ए व बी फॉर्म दिलेले असताना दोन फॉर्म आले कुठून अशी चर्चा रंगली. या संदर्भात राष्टÑवादीच्या काही पदाधिकाºयांना विचारणा केली असता त्यांनी रात्रीतून पक्षाने दोन फॉर्म पाठविल्याच्या चर्चेला दुजोरा दिला.नाराज वसंत गिते गायबनाशिक मध्य मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेले माजी आमदार वसंत गिते यांना पक्षाने अखेर उमेदवारी नाकारली. नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत गिते पक्षाकडून काही तरी ‘खुशखबर’ येण्याची अपेक्षा होती. परंतु पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले. उलट नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेतून ऐनवेळी आलेल्या राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. ढिकले यांचे नामांकन भरण्यासाठी भाजपच्या सर्वच पदाधिकाºयांनी हजेरी लावली मात्र वसंत गिते या साºया प्रक्रियेपासून दूर राहिल्याने ते अजूनही नाराज असल्याची चर्चा रंगली.ए व बी फॉर्म देऊ नका... राष्टÑवादीवर दबावनाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब सानप हे बंडखोरी करून राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी भाजपला अपेक्षा नव्हती. मात्र सकाळी भाजपची शेवटची यादी जाहीर झाल्यानंतर त्यात नाव नसल्याचे पाहून सानप यांनी राष्टÑवादीकडून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यास हिरवा कंदील दर्शविल्यानंतर भाजपची धावपळ उडाली. सानप यांना राष्ट्रवादीने ए व बी फॉर्म देऊ नये यासाठी भाजपने प्रचंड दबाव आणला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनाही दूरध्वनीवरून संपर्क साधून ए व बी फॉर्म न देण्याची विनंती केल्याचे सांगण्यात आले. मात्र सानप यांनी पक्षात प्रवेश केल्याने त्यांना ए व बी फॉर्म द्यावाच लागेल यावर राष्टÑवादी ठाम राहिल्याने अखेरच्या क्षणी सानप यांनी अर्ज दाखल केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय