त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपरिषदेच्या विषय समित्यांना अखेर महसुल विभागाचा मंगळवारी (दि.१६) मुहुर्त लागल्याने दुपारी विषय समित्या निवडीची प्रक्रिया पार पडली. एकुण सहा विषय समित्या व पाच सभापती बिनविरोध निवडले गेले .तर शिक्षण समितीचे सभापती हे शिक्षण समितीचे पदसिध्द सभापती असल्याने उपनगराध्यक्ष सागर उजे हे शिक्षण समितीचे पदसिध्द सभापती म्हणुन गणले गेले.या विषय समित्यांचे नामनिर्देशन सत्तारूढ भाजपचे गटनेता समीर पाटणकर यांनी केले. नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद संख्याबळ १८ (स्विकृतसह) असून दोन शिवसेना व एक अपक्ष असे २१ संख्याबळ नगराध्यक्ष यांच्यासह असल्याने साहजिकच विषय समित्यांच्या सदस्यांसाठी गटनेत्यांनी नावे सुचवली. तर सभापतीपद प्रत्येक विषय समितीत सर्वानुमते जाहीर करण्यात आले.
विषय समित्या व सभापती पुढील प्रमाणे...आरोग्यरक्षक वैद्यकीय यात्रा जत्रा समिती -सभापती अनिता शांताराम बागुल, सदस्य संगिता काळु भांगरे, अशोक नथु घागरे, शितल कुणाल उगले, कैलास बन्सीलाल भुतडा.पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती -सभापती शिल्पा नितीन रामायणे, सदस्य समीर रमेश पाटणकर, दीपक पांडुरंग गिते, सायली हर्षल शिखरे, भारती संपत बदादे,बांधकाम समिती -सभापती कैलास कोंडाजी बोडके, सदस्य समीर रमेश पाटणकर, शितल कुणाल उगले, संगिता काळु भांगरे, कैलास बन्सीलाल भुतडा.महिला व बालकल्याण समिती -सभापती कल्पना अशोक लहांगे, सदस्य भारती संपत बदादे, मंगला उल्हास आराधी, त्रिवेणी सोमनाथ तुंगार(सोनवणे), संगिता काळु भांगरे.शिक्षण समिती -सभापती सागर जगन्नाथ उजे, सदस्य स्वप्निल दिलीप शेलार, दीपक पांडुरंग गिते (लोणारी), शितल कुणाल उगले, विष्णु मंगा दोबाडे. त्याचप्रमाणे सर्व विषय समित्यांचे सभापतींची स्थायी समिती असून त्यासमितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर हे काम पहात आहेत.दरम्यान या सर्व विषय समितीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. उमेदवारी अर्ज सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संजय जाधव यांनी स्विकारले. तर निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तहसिलदार दीपक गिरासे यांनी काम पाहिले.या वेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष सागर उजे, सुरेश गंगापुत्र, स्वप्निल शेलार, शांताराम बागुल, कुणाल उगले, संपत बदादे, काळु भांगरे, समाधान सकाळे, भुषण अडसरे, नितीन रामायणे, शाम गंगापुत्र तसेच संजय मिसर, अभिजित इनामदार, पायल महाले आदी उपस्थित होते.