शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

राजकारणातील निर्मळ मनाचा सर्वमान्य चेहरा हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:33 AM

नाशिक : आपल्या शांत व सौम्य स्वभावामुळे, मात्र सर्व प्रश्नांवर घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे केवळ देशातच नव्हे, तर जगभरात आदराचे स्थान मिळविलेले भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्यामुळे निर्मळ मनाच्या कवी आणि सर्वमान्य राजकीय चेहरा असलेल्या महान व्यक्तिमत्वाला देश मुकला असल्याची भावना नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबतच शिक्षण, सांस्कृतिक, कला, अधात्म क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.

ठळक मुद्देशोकसभा : अटलबिहारी वाजपेयी यांना नाशिकच्या सर्वपक्षियांची श्रद्धांजली

नाशिक : आपल्या शांत व सौम्य स्वभावामुळे, मात्र सर्व प्रश्नांवर घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे केवळ देशातच नव्हे, तर जगभरात आदराचे स्थान मिळविलेले भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्यामुळे निर्मळ मनाच्या कवी आणि सर्वमान्य राजकीय चेहरा असलेल्या महान व्यक्तिमत्वाला देश मुकला असल्याची भावना नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबतच शिक्षण, सांस्कृतिक, कला, अधात्म क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे शनिवारी (दि. १८) माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना नाशिक जिल्ह्यातील मान्यवरांनी शोकसभेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली. अटलबिहारी वाजपेयी हे स्पष्ट वक्ते होते, कवी होते, अनेकदा मृदू असत, आपल्या भूमिकांबाबत ठाम असत आणि विरोधकांबाबतही मित्रत्वाची भावना जपून, त्यांचा मानसन्मान करीत. ते सर्वाथाने सर्वमान्य नेता होते. त्यांच्या निधनाने भारतातील अटलपर्वाचाच अस्त झाल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार हेमंत टकले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, कापड विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिग्विजय कापडिया, माकपाचे श्रीधर देशपांडे, केव्हीएन नाईक शिक्षण संस्थेचे हेमंत धात्रक, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी कला व संस्कृती व अध्यात्म क्षेत्रांतील मान्यवरांनीही अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली. माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी त्यांच्या महापौर काळातील आठवणींना उजाळा देताना वाजपेयींनी कुंभमेळ्यासाठी नाशिक १०० कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगितले. तर पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या अर्थिक विकासासाठी अटलजींनी प्रयत्न केल्याचे मत विनायक गोविलकर यांनी व्यक्त केला.वाजपेयी हे भारतीय राजकारणातील देशभक्तीचा बुलंद आवाज असणारे प्रभावी वक्ते होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते एवढीच त्यांची प्रतिमा नव्हती, तर सर्व राजकीय पक्षात त्यांचे चाहते होते. घराघरांत त्यांच्या वक्तृत्वाचे चाहते होते. सत्तेत असले तरी साधी राहणी आणि उच्च विचार असणाऱ्या अटलजींच्या व्यक्तिमत्वा सोबतच नेतृत्व कौशल्य, कर्तृत्व आणि वक्तृत्व गुणांचा देशवासीयांच्या मनावर प्रभाव असल्याचे मत माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, आरएसएसचे संजय कुलकर्णी, जालिंदर तागडे, जयप्रकाश जातेगावकर, श्रीकांत बेणी, प्रा. यशवंत पाटील, रामसिंग बावरी, सुभाष घिया, लक्ष्मीनारायण बडा मंदिर ट्रस्टचे महंत रामस्नेहिदास महाराज, पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्टचे महंत भक्तिचरणदास महाराज, भक्तिधामचे महामंडलेश्वर सवितानंद सरस्वती, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वासंती दीदी यांनी सांगितले, तर निर्मळ व्यक्तिमत्वाची राजकीय व्यक्ती मिळणे कठीण असले तरी अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या आचार आणि विचारातून हा मेळ साधल्याचे दरम्यान, अटलजींचे विचार तरुणांमध्ये रुजविण्यासाठी अत्याधुनिक वाचनालय अथवा अभ्यासिकेसारखे स्मारक उभारण्याचा विचार मांडला.यावेळी माजी मंत्री तुकाराम दिघोळे, माजी खासदार माधवराव पाटील, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, वसंत गिते यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण सावजी यांनी केले.आम्ही पोरके झालोभारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करताना आमदार देवयानी फरांदे यांना भावना अनावर झाल्या. ज्यांच्या नावाने घोषणा देत आमच्यासारखे कार्यकर्ते मोठे झाले. असे सर्व भाजपाचे कार्यकर्ते वाजपेयी यांच्या जाण्याने पोरके झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी