नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल मराठा बहुजन समितीतर्फे सोमवारी (दि.१९) यंदा वैविध्यपूर्ण शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला असून, यावर्षी प्रथमच अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी ९ वाजता संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शिवप्रेमी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करणार आहेत. त्यानंतर पालखी सोहळ्यासह शहरात डीजे विरहित भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याने शहराला मराठा क्रांती मोर्चानंतर पुन्हा एकदा भगवी झालर चढणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची नोंद इंग्लड येथील वंडर बुक आॅफ रेकॉर्ड आणि जिनिअस बुक आॅफ रेकॉर्ड यांचे पथक घेणार असल्याची माहिती शिवजन्मोत्सव सोहळा समितीने परिषदेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तारखेप्रमाणे साजरी होणाºया जयंतीचे यावर्षापासून ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ असे नामकरण करण्यात आले असून या नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. परंतु जिल्हाभारातील सर्व १५ तालुक्यांसह शहारातील सर्व सहा विभागांमधील शिवप्रेमी अनंत कान्हेरे मैदानावर शिवरायांना वंदन करण्यासाठी जमणार आहेत. त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच जिल्ह्यातील मुख्य पालखी मिरवणुकीला पारंपरिक वाकडी बारवऐवजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून प्रारंभ होणार आहे. वारकºयांचे मंडळ मिरवणुकीच्या अग्रभागी राहणार असून, यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे चार चित्ररथ चालणार आहे. या चित्ररथांसह मागोमाग लेझिम पथक, शिवभक्त महिला आणि सर्वांत पाठीमागे शिवभक्त पुरुष असा या मिरवणुकीचा क्रम राहणार आहे. ही पालखी मिरवणूक अनंत कान्हेरे मैदानावरून निघाल्यानंतर त्र्यंबक नाका सिग्नलमार्गे सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून अशोकस्तंभ, रविवार कारंजावरून पंचवटी कारंजा येथील शिवाजी पुतळ्यासमोर समर्पित होणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले आहे. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे सुनील बागुल, अपूर्व हिरे, शिवाजी गांगुर्डे, शिवाजी सहाणे, करण गायकर, तुषार जगताप, उद्धव निमसे, गणेश कदम आदी उपस्थित होते.तारखेप्रमाणेच शिवजन्मोत्सवशिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा तारखेप्रमाणेच साजरा करण्याचा निर्णय सकल मराठा बहुजन समाजाने घेतला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची ही भूमिका नाही, तर मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीतील ही एक आग्रही मागणी होती. त्यामुळे यापुढे संपूर्ण देशभरात शिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा तारखेप्रमाणेच म्हणजे १९ फेब्रुवारीलाच साजरा होणार आहे. यावर्षापासून आदर्शवत शिवजन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात नाशिकमधून होत आहे. वर्षातील सर्वच ३६५ दिवस हे शिवाजी महाराज यांच्या जयजयकाराचे आहेत. त्यामुळे शिवजन्मोत्सव सोहळा समितीचा कोणासही विरोध नाही, परंतु १९ फे ब्रुवारी शिवाय अन्य दिवशी जयंती साजरी करणाºयांना संपूर्ण समाजच धडा शिकवेल, अशी भूमिका सोहळा समिती सदस्यांनी मांडली.
नाशकात सोमवारी अभूतपूर्व शिवजन्मोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:30 AM