पंचवटी : सध्या शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून, राजरोसपणे खून, लूटमार, घरफोडी, सोनसाखळी, दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना सिंहस्थ कुंभमेळा- २०१५च्या पार्श्वभूमीवर तपोवनात मनपाने उभारलेल्या साधुग्रामच्या प्रवेशद्वारावर बसविलेल्या २५ पैकी २ घंटा चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार सोमवारी (दि. ११) उघडकीस आला आहे.औरंगाबाद महामार्गावरील जनार्दन स्वामी आश्रमालगत साधुग्रामचे प्रवेशद्वार चार वर्षांपूर्वी आकर्षक पद्धतीने उभारण्यात आले आहे. कमानीची शोभा वाढावी यासाठी महापालिकेने ३० फूट उंचीवर २५ घंटा बसविल्या आहेत. या प्रवेशद्वाराला जगद्गुरू रामानंदाचार्य यांचे नाव देण्यात आले आहे. या घंटांमुळे प्रवेशद्वार लक्षवेधी झाले. प्रवेशद्वाराची ही ‘शोभा’ धोक्यात सापडली असून असुरक्षिततेची ‘घंटा’ आता थेट तपोभूमीतून ऐकू येऊ लागली आहे.२३ घंटा सुरक्षित राहणार का?चार वर्षांनंतर या आकर्षक कमानीच्या स्वरूपातील प्रवेशद्वारावरून २ घंटा चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे उर्वरित २३ पितळी घंटा भविष्यात सुरक्षित राहणार का? अशी शंका निर्माण झाली आहे. पोलिसांनी संशयित घंटाचोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. तसेच या २३ घंटांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
असुरक्षिततेची ‘घंटा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 1:07 AM
सध्या शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून, राजरोसपणे खून, लूटमार, घरफोडी, सोनसाखळी, दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना सिंहस्थ कुंभमेळा- २०१५च्या पार्श्वभूमीवर तपोवनात मनपाने उभारलेल्या साधुग्रामच्या प्रवेशद्वारावर बसविलेल्या २५ पैकी २ घंटा चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार सोमवारी (दि. ११) उघडकीस आला आहे.
ठळक मुद्देचोरट्यांचा प्रताप : साधुग्राम प्रवेशद्वारावरील दोन घंटा लांबविल्या