नाशिक : शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून दुपारी तीन वाजेनंतर ढगाळ हवामानासहवादळी वारा सुटत आहे. शुक्रवारी (दि.१५) दुपारी साडेचार वाजेपासून शहरासह उपनगरांमध्ये ढगाळ हवामानासहवादळी वारा सुटला अन् वीजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ७.४ मिमी इतका पाऊस हवामान निरिक्षण केंद्राकडून नोंदविला गेला.दुपारी तीन वाजेपासूनच शहरात ढगाळ हवामान तयार झाल्याने नाशिककरांना उष्माच्या अधिक त्रास जाणवत होता. नाशिककर घरात असतानासुध्दा उकाड्याने घामाघुम झाले. दुपारी साडेचार वाजेपासून वातावरणात अचानकपणे बदल झाला आणि आकाशात ढगांनी अधिकच गर्दी केली. सोसाट्याचा वादळी वारा सुटला. आकाशात वीजा चमकू लागल्या अन् ढगांचा गडगडाटही वाढला. काही वेळेतच शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाला सुरूवात झाली. मखमलाबाद, मेरी-म्हसरूळ पंचवटी या भागात पावसाचा वेग अधिक राहिला तर सिडकोमध्येही जोरदार पावसासह गारांचा वर्षावही झाला. इंदिरानगर, वडाळा, जुने नाशिक, द्वारका, अशोकामार्ग या भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही वेळेतच रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते.लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्याने चार वाजेपर्यंत दैनंदिन व्यवहार बाजारपेठांमध्ये सुरू होते; मात्र ढग दाटून येताच व्यावसायिकांनी दुकाने बंद करण्यास सुरूवात केली. साडेचार वाजेपासून टपोरे थेंब पडण्यास सुरूवात झाली अन् काही मिनिटांतच सरी कोसळू लागल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांसह दुकानदारांची त्रेधातिरपिट उडाली. वादळी वारा सुटताच शहरासह उपनगरांमधील विद्युतपुरवठा महावितरणकडून नेहमीप्रमाणे खंडीत करण्यात आला होता. वादळी वारा थांबताच पुन्हा वीजपुरवठा पुर्ववत केला गेला. काही उपनगरांमध्ये वीस मिनिटे तर काही भागात अर्धा तास वीज गायब राहीली. पावसाने उघडीप देताच काही उपनगरीय परिसरांमध्ये अस्ताला जाणाºया सुर्यनारायनाने दर्शन दिल्याने अल्हाददायक वातावरण अनुभवयास आले.वातावरण थंड झाल्याने दिलासामागील चार दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. पारा चाळीशीला टेकल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी लावलेल्या दमदार हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना संध्याकाळनंतर दिलासा मिळाला. मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नागरिकांना रात्रीची झोपदेखील असह्य होत होती; मात्र पावसामुळे शुक्रवारी रात्री नागरिकांना अल्हाददायक वातावरणाने दिलासा मिळाला.
शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 7:59 PM
मागील चार दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. पारा चाळीशीला टेकल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी लावलेल्या दमदार हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड
ठळक मुद्देअर्ध्या तासात ७ मिमी पावसाची नोंद