ओतुर : कळवण तालुक्यातील ओतुर परिसरात बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा पिकासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
परिसरात कुंडाणे, शिरसमणी, नरुळ, मुळाणे आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली. नुकतीच कांदा काढणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी शेतात कांदा काढून पडला आहे. तो झाकण्यासाठी प्लास्टिकचे कागद घेऊन झाकत आहेत. या अवेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. यावेळी वादळी वारा व विजांचा कडकडाट होत होता. गेल्या दोन दिवसांपासून तापमान कमालीचे वाढले असून उन्हाची तीव्रता वाढली होती. जोरदार वादळ सुटल्याने शिरसमणी येथे कळवण-ओतुर रस्त्यावर झाड कोसळून रहदारी काही वेळ ठप्प झाली होती.
----------
कळवण तालुक्यांतील शिरसमणी येथे वादळामुळे रस्त्यात पडलेले बाभळीचे झाड. (२८ ओतुर १/२)
===Photopath===
280421\28nsk_31_28042021_13.jpg
===Caption===
२८ ओतुर १