मालेगाव : गारपीटमुळे मालेगाव तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी केली. दाभाडी कारखान्याच्या पूर्वेपासून दाभाडी शिवपर्यंत तसेच गिरणा नदी ते वजीरखेडा रोड या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आले. कांदा, डाळिंब, कलिंगड, शेवगा, निंबू, पेरू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेवग्याची झाडे कोलमडून पडली आहेत. तसेच गारपिटीच्या माराने फळे फुटून निघाली आहेत, तर कांदा पूर्णतः वाया गेला. निरंकार निकम यांच्या शेतात तलाठी पगार, कृषी अधिकारी व्यवहारे, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती लकारे हे पंचनामा करीत असताना जिल्हाध्यक्ष निकम यांनी तहसीलदार राजपूत यांना फोन करून तातडीने अहवाल पाठवून भरीव मदत मिळण्याची विनंती केली. दामू निकम, रावसाहेब, बळीराम निकम, सुनील बळीराम निकम, भिकन निकम, दादाजी जाधव आदी शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी करण्यात आली.
मालेगावी अवकाळीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:15 AM