न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील हिंगणे-देहरे येथे अवकाळी पावसाने विजेचे खांब कोसळले तर चार घरांचे छप्पर उडून गेले. कोरोना कालावधीत आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा बेमोसमी पावसाचे अस्मानी संकट ओढवल्याने मोठे नुकसान झाले आहे.
काही कुटुंबाच्या घरांचे छप्पर उडून गेल्याची घटना घडली. अचानक ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने हिंगणे-पिंप्रीतील काही भागाला संध्याकाळी झोडपले. संजय तानाजी बच्छाव (कांदा), मनोज नीळकंठ बच्छाव (मका), नीळकंठ विठ्ठल बच्छाव (कांदा व मका), बापूसाहेब तानाजी बच्छाव (कांदा व कांदा बीजवाई), अंकुश भिकन बच्छाव (कांदा), माणिक नथू बच्छाव (कांदा व बाजरी), देवराम सोना बच्छाव (लिंबू बाग व कांदा) यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे व संतोष दादासाहेब बच्छाव यांचे ज्वारी, कांदा या पिकांचे नुकसान होत शेतातील विद्युत सिमेंट पोल तुटून विद्युत तारा जमीनदोस्त झालेल्या आहेत.