सिडको : नाएसोच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडीच्या विद्यार्थ्यांनी लेजीम स्पर्धेत सहभाग होत यश मिळविले.नाएसोच्या शारीरिक शिक्षण व आरोग्य समितीतर्फे संस्थेच्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी लेजीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक विद्यालय उंटवाडीने स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी ढोल, झांज, तुतारी, संबळच्या तालावर उत्तम सादरीकरण केले. ढोलपथक, झांजपथक, झेंडा पथक यामुळे कार्यक्र माची शोभा वाढली. यावेळी पर्यवेक्षक मधुकर पगारे, बाळासाहेब आहेर, क्रीडाशिक्षक रवींद्र नाकिल, मंगला मुसळे, संदीप भगरे, तुषार पवार, अमोल भडके, पां. म. अकोलकर, मुख्याध्यापक रत्नप्रभा सूर्यवंशी, अशोक कोठावदे उपस्थित होते.
लेजीम स्पर्धेत उंटवाडी विद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:33 AM