शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

शेतकऱ्यांना न वापरलेल्या विजेची बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:33 PM

नांदगाव : तालुक्यात अभूतपूर्व दुष्काळी स्थिती उद्भवली असताना, वीजजोडणी खंडित केल्यानंतरही न वापरलेल्या विजेपोटी हजारो रुपयांची बिले शेतकºयांना आकारण्यात येत आहेत. एकट्या माणिकपुंज धरणातील पाणी उपसणाºया शेकडो कृषिपंप ग्राहकांना अशाप्रकारे अदा केलेल्या बिलांची रक्कम ५० लाखांपेक्षा जास्त असल्याने एकाच वेळी अस्मानी व सुलतानीला तोंड देण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे.

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा महिना : कृषिपंपधारकांकडून चौकशीची मागणी

 

नांदगाव : तालुक्यात अभूतपूर्व दुष्काळी स्थिती उद्भवली असताना, वीजजोडणी खंडित केल्यानंतरही न वापरलेल्या विजेपोटी हजारो रुपयांची बिले शेतकºयांना आकारण्यात येत आहेत. एकट्या माणिकपुंज धरणातील पाणी उपसणाºया शेकडो कृषिपंप ग्राहकांना अशाप्रकारे अदा केलेल्या बिलांची रक्कम ५० लाखांपेक्षा जास्त असल्याने एकाच वेळी अस्मानी व सुलतानीला तोंड देण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे.वीज वितरण कंपनी खंडित विजेचे बिल आकारून आर्थिक संकटात लोटत असल्याचा आक्षेप माणिकपुंज धरणातल्या कृषिपंप ग्राहकांनी घेतला असून, याप्रकरणी माहितीच्या अधिकारातील पत्राचे महिना उलटून गेल्यानंतरही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे यामागे दडलंय काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.जुलै २०१७ मध्ये माणिकपुंज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बसविलेल्या अधिकृत/अनधिकृत वीजपंपांना वीजपुरवठा करणारे रोहित्र खंडित करण्यात आले. नोव्हेंबर २०१७ मध्ये ते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर सुरू असलेला वीजपुरवठा यावर्षी १८ जुलै २०१८ रोजी खंडित करण्यात आला. यासंदर्भात विचारणा करणाºया शेतकºयांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा संदर्भ देण्यात आला. पर्जन्यमान अत्यल्प असल्याने माणिकपुंज धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे, असे उत्तर शेतकरीवर्गाला देण्यात आले. त्याविषयी त्यांची तक्रार नाही; मात्र वीजपुरवठा शासनानेबंद केला आहे. मग बंद कालावधीतील बिल का भरावे, असा शेतकरी ग्राहकांचा प्रश्न आहे. गेल्या वर्षी चार महिने व यंदा पाऊस पडला नाही तर अनिश्चित काळ वीजपुरवठा बंद करण्यात येणार असेल तर या कालावधीचे बिल कशासाठी? म्हणून काही जणांनी तात्पुरते बंद करा, अशी विनंती केली. परंतु ती धुडकावून लावण्यात आली. कायमस्वरूपी बंद करा, असे सांगण्यात आले. म्हणजे चार महिन्यांनतर नवीन कनेक्शन घ्या. कोटेशन घ्या... १० ते १५ हजार रु पये भरा. वीज वितरणाकडे चकरा मारा. त्यासाठी महिना घालवा. असे करण्याऐवजी वीज बंद कालावधीचे बिल आकारू नका, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.माणिकपुंज परिसरात अधिक तक्रारदार१० अश्वशक्तीचा पंप असलेल्या ग्राहकाला वीज बंद असलेल्या चार महिन्यांचे बिल अकरा ते बारा हजार रु पये आले आहे. कोणाचे पाच अश्वशक्तीचे तर कुणाचे अजून वेगळे.. असे सुमारे २०० ते ३०० पंप माणिकपुंजमध्ये आहेत. वीजबिल थकले तर कारवाईची तत्परता दाखविणारे वीज वितरणचे अधिकारी व शासन, ‘न दिलेल्या विजेचे’ पैसे कोणत्या नियमानुसार आकारू शकतात याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी वीजपंपधारक करत आहेत.