सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे बांधण्यात आलेल्या अद्ययावत बुद्धविहार व खंबाळे येथील सभामंडपाचे लोकार्पण शुक्रवारी (दि. २२) होणार आहे. खंबाळे येथे दुपारी १२ वाजता, तर नांदूरशिंगोटे येथे दुपारी १ वाजता सोहळा पार पडणार असल्याची माहिती सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच कविता सानप, खंबाळेचे सरपंच भाऊसाहेब आंधळे यांनी दिली.केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, सभापती शोभा दीपक बर्के, उपसभापती संग्राम कातकाडे, नगराध्यक्ष किरण डगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ भाबड, नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत दिवे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत. उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून बुद्धविहार पूर्णत्वास आले आहे.एक हजार विद्यार्थ्यांना फायदाबुद्धविहारात प्रार्थनेसाठी मोठा हॉल, धर्मप्रचारासाठी देशभर फिरणाऱ्या भिख्खूंकरिता निवासाची सुविधा करण्यात आली आहे. यात अभ्यासिकाही उभारण्यात आली असून, स्पर्धा परीक्षांची पुस्तके त्यात उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याचा परिसरातील २०हून अधिक गावांतील एक हजार विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकेल. बुद्धविहारामुळे नांदूरशिंगोटेच्या लौकिकात भर पडली आहे.
नांदूरशिंगोटेत साकारले अद्ययावत बुद्धविहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 8:37 PM
सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे बांधण्यात आलेल्या अद्ययावत बुद्धविहार व खंबाळे येथील सभामंडपाचे लोकार्पण शुक्रवारी (दि. २२) होणार आहे. खंबाळे येथे दुपारी १२ वाजता, तर नांदूरशिंगोटे येथे दुपारी १ वाजता सोहळा पार पडणार असल्याची माहिती सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच कविता सानप, खंबाळेचे सरपंच भाऊसाहेब आंधळे यांनी दिली.
ठळक मुद्देरामदास आठवले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकार्पण सोहळा