शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

मालेगावात साकारतेय अद्ययावत प्रशिक्षण केंद्र

By admin | Published: June 17, 2014 12:06 AM

मालेगावात साकारतेय अद्ययावत प्रशिक्षण केंद्र

 

शफीक शेख

मालेगावयेथील सामान्य रुग्णालयात शासनाने मंजूर केलेल्या परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाचे बांधकाम वेगात सुरू असून, कसमादे परिसरातील परिचारिका होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींची मोठी सोय होणार आहे.मालेगावी राज्य शासनाने गेल्यावर्षी १५ मार्च २०१३ रोजी परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह इमारतीच्या बांधकामास परवानगी दिली. एकूण दोन हजार २४०.२८ चौ. मी. क्षेत्रफळावर इमारत बांधकाम सुरू असून, तळ मजल्यावर चार वर्गखोल्या, वाचनालय, प्राचार्य कक्ष आणि मीटर रूम याची व्यवस्था राहील.पहिल्या मजल्यावर तीन परिचर्या प्रयोगशाळा, शिक्षकांसाठी दोन खोल्या, प्रशासकीय कक्ष, उपप्राचार्य कक्ष, संगणक कक्ष व प्रतीक्षा रूम यांचा समावेश असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर सेमिनार हॉल, सभागृह, मिटिंग हॉल, प्रतीक्षा रूम, शिक्षकांचा कक्ष व प्रयोगशाळा यांचा समावेश आहे.मुलींसाठी वसतिगृहप्रशिक्षणार्थी परिचारिकांच्या निवासासाठी बांधण्यात येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाची इमारत तीन हजार १२४.६४ चौ.मी. क्षेत्रात तयार होत आहे.सदर वसतिगृहात ११२ विद्यार्थिनी आणि आठ मुलांच्या निवासाची व्यवस्था होणार आहे. त्यात तळ मजल्यावर प्रत्येकी एका रूममध्ये दोन मुली असे १६ कक्ष व प्रत्येकी आठ मुलांसाठी चार कक्ष असतील. त्यात जिम्नॅशियम रूम, सिक रूम, स्टोअर रूम, रेक्टर रूम, स्वयंपाकगृह व भोजन कक्षाचा समावेश आहे. पहिल्या मजल्यावर असा प्रत्येक कक्षात दोन मुलींची व्यवस्था राहणार असून, एकूण २० कक्ष व हॉल असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी दोन मुलींसाठी २० कक्ष असणार आहेत. आमदार दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमाकांत जाधव, डॉ. डांगे यांची बैठक घेण्यात आली. त्यात संबंधिताना सूचना देण्यात आल्या. कार्यकारी अभियंता मराठेदेखील यावेळी उपस्थित होते.खासगी जागेत वर्गशासनाने या वर्षापासून परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे वर्ग सुरू केल्यास भाड्याच्या इमारतीत हे वर्ग भरविण्यात येणार आहेत. त्यासाठी मनमा चौफुलीवरील जीवन हॉस्पिटलच्या इमारतीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते.एएनएम/जीएनएमची व्यवस्थामालेगावच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्रात एएनएम आणि जीएनएम अशा दोन्ही कोर्सेसच्या विद्यार्थिनींना प्रशिक्षण मिळणार असून, त्यांच्या निवासाचीही सोय होणार आहे.