नाशिक : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावतीकरण करण्याच्या कामास नकार देणारे तसेच संथ काम करणाºया केंद्रस्तरीय अधिकाºयांवर (बीएलओ) जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याने तशाच स्वरूपाची कारवाई जिल्ह्यातील कामचुकार बीएलओंवर करण्याचा विचार निवडणूक शाखेने सुरू केला असून, त्यासाठी सर्व तहसीलदारांना पत्र पाठवून माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नाशिक जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला असून, १५ ते ३० नोव्हेंबर या काळात मतदान केंद्रनिहाय बीएलओंची नेमणूक करून त्यांच्याकरवी घरोघरी जाऊन मतदार सर्वेक्षण करण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील अपवाद वगळता एकाही विधानसभा मतदारसंघात गेल्या पंधरा दिवसांत समाधानकारक काम झालेले नाही. बीएलओ म्हणून बहुतांशी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी दैनंदिन शैक्षणिक कामे सांभाळून फावल्या वेळेत प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती संकलित करण्याचे काम करणे अपेक्षित आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांत सुमारे साडेतीन हजार बीएलओंची नेमणूक करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात त्यामानाने काम मात्र सुरू झालेले नाही. काही बीएलओंनी प्रामाणिकपणे काम सुरू केल्याने गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९ हजार घरभेटी देण्यात आल्या आहेत. परंतु एकूण साडेसात लाख कुटुंबाना अद्यापही भेटी देण्याचे काम बाकी आहे. राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच घेतलेल्या आढाव्यात ही बाब स्पष्ट झाल्याने निवडणूक शाखेने दहा तहसीलदारांना नोटिसा बजावल्या आहेत.
मतदार यादी अद्ययावतीकरण : काम करण्यास दिला नकार सातशे बीएलओंवर कारवाईची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:09 AM
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावतीकरण करण्याच्या कामास नकार देणारे तसेच संथ काम करणाºया केंद्रस्तरीय अधिकाºयांवर (बीएलओ) जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याने तशाच स्वरूपाची कारवाई जिल्ह्यातील कामचुकार बीएलओंवर करण्याचा विचार निवडणूक शाखेने सुरू केला
ठळक मुद्देघरोघरी जाऊन मतदार सर्वेक्षण समाधानकारक काम झालेले नाहीदहा तहसीलदारांना नोटिसा