शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उरफाट्या न्यायाने हॉस्पिटलला टाळे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:42 IST

बंगालमध्ये एका रुग्णालयाला आग लागली, त्याचा संदर्भ घेत नाशिकमधील सर्व रुग्णालयांनाच वेठीस धरण्याचे काम सुरू झाले आहे. केंद्र किंवा राज्य सरकारचे नियम पाळण्यासाठी कोणाचा नकार नाही, परंतु अगोदर रुग्णालये मग कायदा असा उरफाटा प्रकार घडल्यानंतर त्याची पूर्वलक्षी पद्धतीने अंमलबजावणी करणे अवघड झाले आहे. कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी दहा-वीस वर्ष अगोदर काही तर महापालिकेच्या स्थापनेआधी असलेल्या रुग्णालयांच्या इमारतींना आता तोडफोड करून मिळकतच उध्वस्त करायची का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नियमामुळे हॉस्पिटललाच टाळे लागण्याची वेळ आली आहे.

संजय पाठक ।नाशिक : बंगालमध्ये एका रुग्णालयाला आग लागली, त्याचा संदर्भ घेत नाशिकमधील सर्व रुग्णालयांनाच वेठीस धरण्याचे काम सुरू झाले आहे. केंद्र किंवा राज्य सरकारचे नियम पाळण्यासाठी कोणाचा नकार नाही, परंतु अगोदर रुग्णालये मग कायदा असा उरफाटा प्रकार घडल्यानंतर त्याची पूर्वलक्षी पद्धतीने अंमलबजावणी करणे अवघड झाले आहे. कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी दहा-वीस वर्ष अगोदर काही तर महापालिकेच्या स्थापनेआधी असलेल्या रुग्णालयांच्या इमारतींना आता तोडफोड करून मिळकतच उध्वस्त करायची का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नियमामुळे हॉस्पिटललाच टाळे लागण्याची वेळ आली आहे. कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी सुलभ पद्धतीने झाली तर त्याचे स्वागतच असते. परंतु कायद्यावर बोट ठेवण्याच्या नावाखाली एखादा व्यवसायच उद्ध्वस्त होत असेल तर काय करायचे, असा प्रश्न वैद्यकीय व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे.  २०११-१२ मध्ये पश्चिम बंगालमध्ये एका रुग्णालयाला आग लागली आणि त्यात चाळीस बालकांचा होरपळून मृत्यू झाला. सदरचे प्रकरण तेथील उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर सर्वच रुग्णालयांसाठी मानके तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. अर्थातच उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अंमल सुरू केला. राज्य सरकारने अगोदरच २००९ मध्ये अग्निशमन उपाययोजना कायदा तयार केला होता. त्यानंतर बंगालमधील घटनेनुसार २०१३ मध्ये नवीन कायदा आणि नियम आले. त्यानुसार नॅशनल बिल्डिंग कोड तीननुसार सर्व रुग्णालयांना उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या. सामान्यत: बांधकामा संदर्भातील एखादा कायदा आला तर अगोदरच्या बांधकामात बदल शक्य नसल्याने तो भविष्यकालीन वास्तूंसाठी लागू होऊ शकतो. परंतु महापालिकेने रुग्णालय नवे असो की जुने सर्वांनाच एकच नियम लागू केला आहे.नॅशनल बिल्डिंग कोडनुसार एखाद्या रुग्णालयासाठी बेडनुसार निकष ठेवण्यात आले आहेत. परंतु सामान्यत: सर्व रुग्णालयांना तीन मीटर रुंदीची स्टेअर केस आवश्यक आहे.  शिवाय रुग्णालयाची इमारतीने अग्निशमन दलाचा बंब फिरेल इतके म्हणजे सुमारे सहा मीटर सामासिक अंतर सोडणे आवश्यक आहे. हा नियम नव्या रुग्णालयासाठी बांधकाम परवान्याचा अर्ज करताना त्याला लागू झाला तर संबंधित वैद्यकीय व्यावसायिक त्यानुसारच बांधकाम करून घेईल. परंतु सदरचा कायदा येण्याआधी ज्यांनी रुग्णालये बांधली आहेत, ते सध्याच्या इमारतीत कशी दुरुस्ती करणार हा साधा प्रश्न आहे. त्यातच शहरातील सर्वच रुग्णालये हे स्वतंत्र इमारतीत आहेत, अशातला भाग नाही. अनेक रुग्णालये ही व्यापारी संकुलात दहा-वीस वर्षांपासून अस्तित्वात आहेत. या इमारतीत अन्य आस्थापना आहेत. शेजारी अन्य इमारती आहेत, त्यांनी तीन मीटरची स्टेअरकेससाठी इमारतीच्या ढाच्याला हात लावायचा की सामासिक अंतरासाठी इतर संकुलांना दूर करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.  नाशिक महापालिकेच्या आजपर्यंतच्या आयुक्तांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनाच हा विषय तांत्रिकदृष्ट्या समजून सांगण्यात आला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. गेल्या एप्रिल महिन्यात महापालिकेच्या विद्यमान आयुक्तांकडे यासंदर्भात बैठक झाली. त्यांनी तोडगा काढण्याचे मान्य केले. त्यानुसार संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांनी अर्ज दाखल केले. परंतु नंतर प्रशासनाने पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरू केल्याने गोंधळ कायम आहे.मनपाचे अधिकारी काय करत होते? नाशिक महापालिकेच्या लेखी पूर्वी इमारतीत २०१३ पूर्वी व्यापारी संकुल ही कॅटेगिरी होती. नंतर हॉस्पिटल नव्याने कॅटेगिरी दाखल झाली आहे. परंतु त्या आधी महापालिकेने सर्व रुग्णालयांना प्रचलित बांधकाम नियमावलीने मंजुरी दिली आणि रीतसर पूर्णत्वाचे दाखले दिले. ही सर्वच कामे बेकायदेशीर होती काय, महापालिकेच्या नगररचना विभागाने अशा परवानग्या देताना बेकायदेशीरीत्या मंजूर केले असेल तर त्यावर काय कारवाई होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  नाशिक शहरातील महापालिका मुख्यालयाच्या सभोवतालची काही व्यापारी संकुलातील रुग्णालये ही वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची आहेत. शहरातील काही रुग्णालये तर १९७०-७२ या वर्षात म्हणजे महापालिका स्थापन होण्याआधी बांधली आहेत. भूतपूर्व नगरपालिकेने त्यांना पूर्णत्वाचे दाखले दिले आहेत. आता तेथे अग्निसुरक्षेचे आणि नॅशनल बिल्डिंग कोडनुसार कामे कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल