शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

उलथापालथ : कॉँग्रेस - महाज युती संपुष्टात; कॉँग्रेस विरोधात सर्व एकत्र?

By admin | Published: July 22, 2014 10:37 PM

मालेगावी नवीन राजकीय समीकरणांना वेग

 मालेगाव ल्ल येथील महानगरपालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व तिसरा महाज यांच्यातील युती संपुष्टात आल्याचे तिसरा महाजचे संस्थापक आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी एकतर्फी घोषित केले आहे. आगामी विधानसभा निवडणुका पाहता तसे होणे अपेक्षितच होते. मात्र त्यामागे केवळ विधानसभा निवडणुकीचे गणित नसून त्याचा परिणाम मनपातील सत्तांतरणावरदेखील होऊ शकतो. शहरातील दखनी-मोमीन वाद पाहता विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याच्या बोलीवर केवळ चार नगरसेवक असूनही ज्येष्ठ जनता दल नेते निहाल अहमद यांचे पुत्र मनपातील जनता दल गटनेते बुलंद एक्बाल यांच्या गळ्यात अनपेक्षितरीत्या महापौरपदाची माळ पडू शकते. अर्थात स्थायी समिती सभापतिपद व उपमहापौरपद यावरही तिसरा महाजचाच दावा राहणार आहे. मात्र यासाठी आवश्यक मनपातील बहुमताचा आकडा पार करण्यासाठी संभाव्य तिसरा महाजला जदच्या आघाडीला कुणाची व कशी आणि कोणत्या अटी-शर्तींवर मदत लाभते याकडे आता राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे. दोन वर्षांपूर्वी ८० सदस्य असलेल्या मनपा सभागृहात कॉँग्रेस (२४) व तिसरा महाज (२०) यांच्या आघाडीची सत्ता स्थापन झाली. त्यात महापौरपद व स्थायी समिती सभापतिपद कॉँग्रेसने आपल्याकडे राखले. उपमहापौरपद तेवढे महाजकडे होते. मनपाच्या कारभारात आणि शहरातील तथाकथित विकासकामात महाजच्या नगरसेवकांना सतत डावलण्यात आल्याचा आरोप कायम होत राहिला. तसेच शहराच्या राजकारणात दखनी-मोेमीन वाद पूर्वापार आहे. त्यामुळे दखनी असलेल्या माजी आमदार रशीद शेख व पुत्र आसिफ शेख यांना शह देण्यासाठी अन्सारी-मोमीन गटाचे प्रतिनिधी असलेले ज्येष्ठ जनता दल नेते निहाल अहमद व आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांची पडद्यामागे युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वयोमान व आजारपणामुळे निहाल अहमद यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. जनता दलाकडून विधानसभेसाठी कोणी उमेदवारी करणे व त्यास जनसमर्थन लाभणे तसे अवघड आहे. त्यामुळे आपला मुलगा तथा मनपातील जदचे गटनेते बुलंद एक्बाल यांना शहराच्या राजकारणात ‘सेट’ करण्याचा निहाल अहमद यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने मनपाचे महापौरपद मुलगा बुलंद एक्बाल यास दिले, तर आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना जनता दलाकडून पाठिंबा दिला जाऊ शकतो. शेख पिता पुत्रांचा मुकाबला करण्यासाठी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल हा पर्याय स्वीकारतील शिवाय मनपातील उपमहापौरपद व स्थायी समिती सभापतिपद पदरात पाडून घेतील, असा अंदाज आहे. ८० सदस्यांच्या सभागृहात कॉँग्रेसचा (२४ सदस्य) मुकाबला करण्यासाठी महाज व जनता दल (२०+४=२४) संख्याबळ पुरेसे नाही. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असा ४१चा आकडा पार करण्यासाठी शिवसेना आघाडी (११) व राष्ट्रवादी (८) तसेच अपक्ष (५) व मनसे (२) व इतर पक्षीय नगरसेवकांची मदत घेतली जाऊ शकते. आमदार भुसे व आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यातील सख्य पाहता सेना महाज व जदला मदत करू शकते. तसेच शेख पिता-पुत्रास विरोध म्हणून युनूस ईसा हे राष्ट्रवादी (८) व इतर मित्रपक्ष यांची रसद महाज - जद आघाडीस पुरवू शकतात. त्यासाठी पडद्यामागे काय हालचाली व तडजोडी होतात यावर बऱ्याच राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. (प्रतिनिधी)