चांदोरी : नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्तशेतकरी कुटुंबियांना भेट देऊन त्यांना शासनाच्या जास्तीत जास्त सुविधा मिळून देण्यासाठी पाठपुरावा करणे या उद्देशाने सुरू झालेल्या उभारी अभियानाचा चांदोरी येथे तहसीलदार शदद घोरपडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.उभारी या अभियानांतर्गत नाशिक विभागात महात्मा गांधी जयंतीपासून 9 आॅक्टोबरपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांची सध्याची अवस्था, आतापर्यंत मिळालेल्या योजनांचा लाभ, स्वयंरोजगार देण्यासाठी प्रयत्न याची माहिती प्रत्यक्ष कुटुंबियांची भेट घेण्यासाठी हा शासकीय उपक्र म तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे. चांदोरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी खंडेराव मुरलीधर आहेर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी मंडळ अधिकारी विनोद काकड, तलाठी निखिल शिरोडे, कृषी सहाय्यक संगीता सोनवणे, गोदावरी सोसायटी सचिव अशोक डावखर, पोलीसपाटील अनिल गडाख, वाल्मीक गडाख आदी उपस्थित होते.