शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शहरातील कोरोना निर्बंध शिथिल लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण : ग्रामीणमध्ये निर्बंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 00:24 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लावलेले काहीअंशी निर्बंध उठविण्यासाठी देण्यात आलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे उद्दिष्ट नाशिक महापालिका क्षेत्रात ...

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लावलेले काहीअंशी निर्बंध उठविण्यासाठी देण्यात आलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे उद्दिष्ट नाशिक महापालिका क्षेत्रात पूर्ण झाल्यामुळे तसेच घटती रुग्णसंख्या व मृत्यूचे कमी झालेले प्रमाण पाहता नाशिक शहरातील कोरोना निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. या निर्बंध शिथिलतेने चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, स्पा सेंटर, हॉटेल, रेस्टॉरंट आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असून, या शिवाय लग्नसमारंभाच्या उपस्थितीवरील निर्बंध पूर्णत: उठविण्यात येणार असून, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांनाही पूर्णत: सूट देण्यात येणार आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत लावण्यात आलेली संचारबंदीही मागे घेण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय शुक्रवारी (दि. १८) घेण्यात आला असला तरी, येत्या दोन दिवसात त्यासंदर्भातील आदेश काढण्यात येणार आहेत.शुक्रवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाचे सद्य:स्थितीत असलेले ररुग्ण व पॉझिटिव्हिटी रेट याचा आढावा घेण्यात आला. १७ मार्च रोजी जिल्ह्यात ७४ रुग्ण असून, पॉझिटिव्हिटी दर ०.५० इतका खाली गेला आहे. शिवाय ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर एकही रुग्ण उपचार घेत नसून, जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचा दरही १.८६ टक्क्याने कमी झाला असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.शासनाने ९ जानेवारी रोजी काढलेल्या कोरोना निर्बंध आदेशात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यांना कोरोना निर्बंध मुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. साधारणत: ९० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झालेला, तर ७० टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झालेला असेल तर निर्बंध मुक्त करण्याचे ठरविण्यात आले होते. नाशिक महापालिका क्षेत्रात हे दोन्ही निकष पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील कोरोना नियम शिथिल करण्यात येत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही लसीकरणाचा वेग वाढत नसल्याने पालकमंत्री भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशा सूचनाही भुजबळ यांनी यावेळी केल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते...असे होते निर्बंध* जानेवारी महिन्यात शासनाने जाहीर केलेल्या कोरोना निर्बंधात चित्रपटगृहे, नाट्यगृहे, अमेजिंग पार्कमध्ये क्षमतेच्या पन्नास टक्केच उपस्थिती अनिवार्य केली होती.* स्पा सेंटर, जलतरण तलाव, स्विमिंग पूल, वॉटर पार्क येथेही पन्नास टक्के क्षमतेने उघडण्यास अनुमती दिली होती.* धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांना जागेच्या प्रमाणात अथवा २५ टक्के उपस्थितीला मुभा होती.* लग्नसमारंभासाठी दोनशे वऱ्हाडींना अथवा जागेच्या क्षमतेवर ५० टक्के उपस्थितीला परवानगी होती.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या