शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

शहरी ग्रामीण भागातील मतदारांमध्ये उत्साह  मात्र मशीनमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:16 AM

देवळाली विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात सोमवारी दिवसभर मोठ्या उत्साहात उत्स्फूर्तपणे मतदान पार पडले. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाड वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले.

नाशिकरोड : देवळाली विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात सोमवारी दिवसभर मोठ्या उत्साहात उत्स्फूर्तपणे मतदान पार पडले. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाड वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले.देवळाली मतदारसंघातील शहरी भागातील देवळाली कॅम्प छावणी परिषद, भगूर नगरपालिका वगळून ूइतर ग्रामीण भागातील ८० गावांमध्ये ६६ मतदान केंद्र होते. सोमवारी सकाळी मतदानप्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती. विहितगाव मनपा शाळा मतदान केंद्रातील खोली क्रमांक ६ मधील ईव्हीएम मशीन मतदानप्रक्रिया सुरू झाल्यापासूनच तब्बल दोन तास नादुरुस्त झाले होते. यामुळे त्या खोलीत मतदानासाठी आलेल्या मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. सकाळी ९ वाजता नवीन ईव्हीएम मशीन लावून मतदानप्रक्रिया सुरू करण्यात आली.शहरातील मनपा प्रभाग १९ व २२, देवळाली कॅम्प छावणी परिषद हद्दीत पाच मतदान केंद्रात व २९ खोल्या व भगूर नगरपालिका हद्दीत चार मतदान केंद्रात १२ खोल्यांवर मतदानप्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये भगूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा खोली क्रमांक तीनमध्ये ईव्हीएम सकाळी पावणेअकरा वाजता अर्धातास नादुरुस्त झाल्याने त्या खोलीकरिता सायंकाळी मतदान अर्धा तास वाढवून देण्यात आला होता. देवळालीगाव, विहितगाव भागातील नव मतदारांनी पत्ता देवळाली-६८ असा दिल्याने अनेकांचे मतदान देवळाली कॅम्प भागात आल्याने युवा मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला. मतदार यादीतील गोंधळ, चुकीची नावे, दुबार मतदार यादीत नावे यामुळे मतदारांना त्रास झाला़देवळाली मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील बेलतगव्हाण, संसरी, राहुरी, दोनवाडे, लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी, एकलहरा,सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, शिंदे, पळदे, मोह, नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागातील दरी, मातोरी, मुंगसरा, दुगाव, गिरणारे, देवरगाव, साडगाव, वडगाव, ओझरखेड, गंगामाळुंजी, विल्होळी, तळेगाव, महिरावणी, बेळगाव ढगा, वासळी आदींसह ८० गावांतील ६६ मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहात शांततेत मतदान पार पडले. मतदान काळात कुठेही अनूचित घटना घडली नाही. उन्हाच्या तडाख्यातमतदार उत्स्फूर्तपणे रांगा लावून मतदान करत होते. संसरीत ७० टक्केखासदार हेमंत गोडसे यांच्या संसरी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रात चार खोल्यांमध्ये मतदान घेण्यात आले. सकाळी मतदारांनी रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजविला. दुपारच्या काळात धिम्या गतीने व सायंकाळी पुन्हा मतदानाचा जोर वाढला होता.वादविवादनिवडणुकीच्या मतदानामध्ये यापूर्वी नेहमी बोगस मतदारांवरून मोठ्या प्रमाणात वादविवाद होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. मात्र मतदार यादीत आलेला पारदर्शकपणा, फोटो, ओळखपत्र यामुळे बोगस मतदानाला आळा बसल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक