यावेळी झालेल्या बैठकीत डी.एड. व बी.एड. बेरोजगार उमेदवारांच्या अडचणी दूर कराव्यात, बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी आयोजन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, खासगी प्राथमिक, माध्यामिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित पद्धतीनुसार अनुदान वितरणाचा आदेश काढावा, १७ ड महापालिकांना शासनाकडून शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली संदर्भातील अन्यायकारक अटींमध्ये सुधारणा करावी, पती-पत्नी एकत्रीकरण, आंतरजिल्हा बदली दहा टक्केची जाचक अट रद्द करावी, शिक्षण सेवकांचे मानधन सातव्या आयोगाप्रमाणे २१ हजार करावे, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फी कोरोना संसर्गामुळे माफ करावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरावे आदी विषयांचे निवेदन यावेळी त्यांना देण्यात आले. याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिलेे. यावेळी साजिद अहमद, फैज अहमद, अल्ताफ अहमद, तसनीम सय्यद, अजार अहमद आदी उपस्थित होते.
उर्दू शिक्षक संघटनेने घेतली राज्यपालांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:13 AM