लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : युरीया खताचा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊन युरीया खत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाने गुरु वारी (दि. ३०) सकाळी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण सायंकाळी गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांचे लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.देशमुख यांनी लेखी आश्वासनात, येवला तालुक्यात जिल्ह्यातील संरक्षित साठ्यातून शंभर टन युरीया उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच लगतच्या कालावधीत जिल्ह्यासाठी प्राप्त होणाºया रॅकमधून सर्व ई पास धारक विक्र ेत्यांना जास्तीत जास्त युरीया खत देण्यात यावे अशी विनंती करणारे पत्र पंचायत समितीने जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांना दिले असल्याचे म्हटले आहे. लगतच्या दोन तीन दिवसात तालुक्यास २०० टन युरीया उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खत विक्र ी दरम्यान लिकींग वा इतर खत घेण्याची विक्र ेत्यांनी सक्ती करू नये, अशा सूचना विक्र ेत्यांना करण्यात आल्या असून असे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असेही देशमुख यांनी म्हटले आहे.गटविकास अधिकारी देशमुख यांच्या आश्वासनानंतर उपोषण आंदोलन मागे घण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी प्रशांत वास्ते, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी उपस्थित होते.सदर आंदोलनात प्रहार शेतकरी संघटनेचे हरिभाऊ महाजन, उपाध्यक्ष वसंत झांबरे, किरण चरमळ, रामभाऊ नाईकवाडे, भागवत भड, संतोष रंधे, गोरख निर्मळ, सुनील पाचपुते, शंकर गायके, मेहबूब शेख, सचिन पवार, गणेश लोहकरे, संजय मेंगाणे, सागर नाईकवाडे, बाळासाहेब बोराडे, शिवाजी निकम, योगेश ठाकरे आदी सहभागी झाले होते.
युरीया खत प्रश्नी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 7:19 PM
येवला : युरीया खताचा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊन युरीया खत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाने गुरु वारी (दि. ३०) सकाळी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण सायंकाळी गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांचे लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
ठळक मुद्दे ई पास धारक विक्र ेत्यांना जास्तीत जास्त युरीया खत देण्यात यावे