कामगार सेना : कामगार बचाव संघर्ष यात्रा
नाशिक : कामगारांच्या कायद्यात बदल करताना त्यात कामगार हितापेक्षा उद्योजकांचे हित जपण्यात आल्याने असंघटित क्षेत्रात मोडणाºया कामगारांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे असंघटित कामगारांची होणारी उपासमार व नैराश्यामुळे आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महाराष्टÑ कामगार सेनेने सर्व कामगारांचीही कर्जमाफी करावी, या मागणीसाठी सोलापूर येथून कामगार बचाव संघर्ष यात्रा काढली आहे.दोन दिवसांपूर्वी या यात्रेचे नाशिक येथे आगमन झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने नाशिकसह महाराष्टÑातील सर्व कष्टकरी कामगारांची कर्जमाफी करावी, शेतमजुरांना कामगार कायदे लागू करा व त्यांची कर्जमाफी करा, असंघटित क्षेत्रातील कामगारांना कामगार कायदे लागू करा, असंघटित कामगारांना दर महा दहा हजार रुपये पेन्शन लागू करा, प्रॉव्हिडंट फंड लागू करा, कामगारांना विमा कायदा लागू करा, सर्व कामगारांना अपघाती विमा लागू करा, असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना शैक्षणिक, आर्थिक व आरोग्यविषयक योजना राबविण्यात याव्यात, असंघटित कामगारांना मोफत बस प्रवास द्या आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी विष्णू कारमपुरी, शिवा ढोकळे, रामचंद्र गदमे, प्रशांत जक्का, सलीम शेख, अशोक हबीब आदी उपस्थित होते.