पेठ : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने चालवण्यात आलेले आदिवासी भागातील एकाधिकार धान्य खरेदी केंद्र नोव्हेंबर महिना संपत आला तरी सुरू न झाल्याने आदिवासी शेतकºयांना कवडीमोल दरात खुल्या बाजारात धान्य विक्री करावी लागत होती. पेठ तालुक्यातील करंजाळी परिसरातील संतप्त शेतकºयांनी मागील आठवड्यात याबाबत आंदोलन छेडले होते. शेतकºयांच्या भावना लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाला अखेर करंजाळी येथे एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू केले आहे.पेठसारख्या आदिवासी व दुर्गम तालुक्यात बाजार समिती नसल्याने शेतकºयांना आपला शेतमाल विक्रीसाठी मोठी कसरत करावी लागते. भाजीपाला नाशिक किंवा गुजरातला, तर धान्य खुल्या बाजारात खासगी व्यापाºयांना कवडीमोल भावात द्यावे लागते. शेतकºयांची आर्थिक कुचंबणा होत असल्याने संतप्त शेतकºयांनी नाशिक - गुजरात महामार्गावर मागील आठवड्यात रास्ता रोको आंदोलन छेडले. पोलीस प्रशासन व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाºयांनी मध्यस्थी करत धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकºयांनी आंदोलन स्थगित केले होते. तसेच पेठ तालुका काँग्रेस कमिटीनेही तहसीलदारांना निवेदन देऊन केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. आदिवासी विकास महामंडळाने दखल घेत करंजाळी येथील एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करून आधारभूत किमतीप्रमाणे भात, नागली सह इतर धान्याची खरेदी सुरू केली आहे.
तातडीने दखल : आदिवासी विकास महामंडळ करणार आधारभूत किमतीने खरेदी करंजाळी येथील एकाधिकार केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 11:54 PM
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने चालवण्यात आलेले आदिवासी भागातील एकाधिकार धान्य खरेदी केंद्र नोव्हेंबर महिना संपत आला तरी सुरू न झाल्याने आदिवासी शेतकºयांना कवडीमोल दरात खुल्या बाजारात धान्य विक्री करावी लागत होती.
ठळक मुद्दे कवडीमोल दरात खुल्या बाजारात धान्य विक्रीशेतकºयांची आर्थिक कुचंबणा