इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवनगरी परिसरात असलेल्या ‘ऐश्वर्या रेसिडेन्सी’च्या वाहनतळ येथील रहिवासी सुरजित सिंग यांनी सोमवारी (दि. १२) सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या मालकीची इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंगसाठी अपार्टमेंटच्या वाहनतळात असलेल्या वीज मीटर पेटीच्या जवळ मुख्य स्वीचमध्ये जोडणी करून लावली होती. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रमाणापेक्षा जास्त बॅटरी चार्ज झाल्याने तिचा स्फोट होऊन दुचाकीला आग लागली. यामुळे सोसायटीचे वीज मीटर असलेली संपूर्ण पेटी जळून राख झाली. यामुळे या इमारतीतील सर्व रहिवाशांच्या वीज मीटरचे नुकसान होऊन वीजपुरवठाही खंडित झाला. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच सिडको उपकेंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविली. यावेळी इंदिरानगर पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.
---
120721\12nsk_6_12072021_13.jpg~120721\12nsk_7_12072021_13.jpg
जळून कोळसा झालेली दुचाकी~वीज मीटरची जळालेली पेटी