सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी विकासकामांना तालुक्यातील यंत्रणाच वापरण्यात यावी, या मागणीचे निवेदन तालुका अर्थमुव्हर्स संघटनेने तहसीलदार यांनी देण्यात आले.सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू झालेले आहे. संबंधित काम ज्या विकासकांनी घेतले आहे ते या कामासाठी लागणारी यंत्रसामग्री बाहेरून आणत असल्याचे निदर्शनास येत आहे. समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या स्वरूपाचे आहे. या कामासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री, कच्चा माल लागणार आहे. तालुका दुष्काळी असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री कर्ज काढून खरेदी करून त्यावरच उदरनिर्वाह करीत आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता वाहनधारकांना काम मिळावे, असे निवेदनात म्हटले आहे.यावर्षी पडलेला भीषण दुष्काळ आणि त्यामुळे निर्माण झालेल्या कामांच्या कमरतेमुळे तालुक्यातील बहुतांश लोकांची सर्व यंत्रसामग्री उभी आहे. तरी या प्रकल्पासाठी लागणारी सर्व यंत्रणा ही अगोदर स्थानिकांची घेण्यात यावी अशी सक्ती आपल्या स्तरावरून करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा, अशी अपेक्षा सिन्नर तालुका अर्थमुव्हर्स असोसिएशनच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, संघटनेचे अध्यक्ष रमेश पांगारकर, सरचिटणीस पंकज जाधव, शांताराम नवाळे, मंगेश शेळके, नीलेश जगताप, सोमनाथ पेखळे, रमेश शेळके, विलास सांगळे, दशरथ रूपवते, ज्ञानेश्वर सानप, अजय हुळहुळे, अरुण उगले, रामदास सानप, सचिन शिंदे, बाळासाहेब शेळके, सुदाम रूपवते, सुनील घुगे, महेश ढवळे, संचित शेळके, दत्ता मुंगसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
समृद्धीसाठी स्थानिक यंत्रणा वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:37 AM
सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी विकासकामांना तालुक्यातील यंत्रणाच वापरण्यात यावी, या मागणीचे निवेदन तालुका अर्थमुव्हर्स संघटनेने तहसीलदार यांनी देण्यात आले.
ठळक मुद्देअर्थमुव्हर्स संघटना : तहसीलदारांना निवेदन