नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असूनही शासनाने हळूहळू संचारबंदी व लॉकडाऊनमध्ये बऱ्या प्रमाणात शिथिलता दिली असल्याने त्यामुळे जनजीवन सुरुळीत होण्याबरोबरच शासकीय कार्यालयांमध्येही अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढली आहे. तथापि, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी व अधिकाºयांची संख्या नियंत्रित करण्याचा शासनाचा विचार सुरू असून, त्यामुळे शासकीय काम करताना अधिकारी व कर्मचाºयांनी ई-मेल, व्हॉट््सअॅप या सोशल माध्यमाचा वापर करून केलेले शासकीय कामकाज ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या संदर्भात दोन दिवसांपूर्वी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढून सर्व शासकीय कार्यालयांना अवगत केले आहे. त्यात नमूद केले आहे की कोरोना विषाणूंचा प्रसार राज्य शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी व कर्मचाºयांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असून, त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील कर्मचाºयाची उपस्थिती नियंत्रित करण्यात येत आहे.प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी त्यांचे शासकीय व खासगी ई-मेल आयडी, एस.एम.एस., व्हॉटसअॅपची सुविधा असलेला मोबाइल क्रमांक कार्यालय प्रमुखास देण्यात यावा. प्रशासकीय कामकाजासाठी ई-मेल, व्हॉट््स अपचा वापर जास्तीत जास्त करून शासकीय कामाचा निपटारा करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
शासकीय कामासाठी सोशल माध्यमांचा वापर ग्राह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 10:35 PM