नाशिक : तलाठीपदाच्या लेखी परीक्षेसाठीच्या परीक्षा हॉलमध्ये दूरसंचार साहित्य जवळ बाळगणाऱ्या परीक्षार्थीविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या परीक्षार्थीचे नाव रामचंद्र महाजन बहुरे (२६) असे नाव असून तो औरंगाबाद जिल्ह्यातील बबळ्याची वाडी येथील रहिवासी आहे़महसूल विभागाच्या वतीने रविवारी (दि़ ११) नाशिक शहरातील विविध शाळांमध्ये तलाठी पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली़ या परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षार्थीने परीक्षा केंद्रात मोबाइल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी असे साहित्य आणण्यास व वापरण्यास बंदी आहे़ मराठा हायस्कूलच्या वाघ गुरुजी शाळेतील खोली क्रमांक दहामध्ये रामचंद्र बहुरे या परीक्षार्थीचा क्रमांक होता़ पर्यवेक्षक अशोक खंडेराव मुंढे यांनी दूरसंचार साहित्य न वापरण्याची सूचना करूनही बहुरेकडे परीक्षेदरम्यान दूरसंचार साहित्य आढळून आले़ याप्रकरणी पर्यवेक्षक मुंढे यांच्या फिर्यादीवरून परीक्षार्थी रामचंद्र बहुरे विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम इतर विशिष्ट परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठी परीक्षेत दूरसंचार साहित्याचा वापर
By admin | Published: September 15, 2016 1:03 AM