ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १४ - तलाठीपदाच्या लेखी परीक्षेत एका उमेदवाराने परीक्षा हॉलमध्ये दुरसंचार साहित्य जवळ बाळगल्याने त्याच्याविरूद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ रामचंद्र महाजन बहुरे (२६) असे संशयीत परिक्षाथीर्चे नाव असून तो औरंगाबाद जिल्ह्यातील बबळ्याची वाडी येथील रहिवासी आहे.
महसूल विभागाच्यावतीने रविवारी तलाठी पदाची परीक्षा घेण्यात आली होती़ या परीक्षेसाठी मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजीटल डायरी असे साहित्य वापरण्यास बंदी आहे. मराठा हायस्कुलच्या वाघ गुरुजी शाळेत बहुरे हा परीक्षेसाठी आला होता. परीक्षेसाठी दूरसंचार साहित्य वापरण्यावर बंदी असल्याच्या सूचना देऊनही बहुरे हे साहित्य घेऊन परीक्षा हॉलमध्ये बसलेला होता.
याप्रकरणी पर्यवेक्षक अशोक खंडेराव मुंढे यांच्या फिर्यादीवरून परीक्षार्थी रामचंद्र बहुरे विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात परिक्षा गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.