नाशिक : राज्यात प्लॅस्टिकबरोबरच थर्माकोललादेखील बंदी करण्यात आलेली आहे. थर्माकोल वापर आणि निर्मितीच्या बाबतीत अद्यापही काही आक्षेप असले तरी प्रत्यक्षात थर्माकोलला बंदी लागू असल्यामुळे थर्माकोलपासून बनविण्यात येणाऱ्या अनेक वस्तू हद्दपार झालेल्या आहेत. मात्र बंदीपूर्वी आणि बंदी असताना बर्फ ठेवण्यासाठी अनेक विक्रेते थर्माकोल बॉक्सचा सर्रास वापर करताना आढळून येतात.पर्यावरणाला हानीकारण ठरणारे प्लॅस्टिक आणि विघटन होत नसल्याने थर्माकोल वापरण्याला महाराष्टÑ शासनाने बंदी घातलेली आहे. सदर बंदीची अंमलबजावणी करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात जप्तीची तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. जप्त केलेले प्लॅस्टिक जमा करण्याची स्वतंत्र यंत्रणादेखील राबविण्यात आली. अगदी दुकानदारांपासून ते ग्राहकांपर्यंत पोहचून प्रशासनाने प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू केली. या बंदीमुळे होणारा विरोध आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचा विचार करून नियमांमध्ये काही प्रमाणात बदलदेखील करण्यात आले आहेत.थर्माकोल वापराबाबतदेखील अनेक दावे-प्रतिदावे केले जात असले तरी थर्माकोलपासून बनविलेल्या वस्तूंना पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे. गणेशोत्सवाचा अपवाद वगळता थर्माकोलच्या वस्तू बंदिस्त करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये थर्माकोलच्या ताटवाट्या, ग्लासेस तसेच थर्माकोलपासून बनविण्यात येणाºया वस्तूंवरदेखील बंदी आहे. असे असताना थर्माकोलचा बॉक्स सर्वत्र वापरण्यात येत असल्याचे दिसते. विशेषत: फळांचा रस विकणाºया हातगाडीवरील विक्रेत्यांकडे तसेच दही, ताक, लस्सीचे स्टॉल्स लावणाऱ्यांकडून बर्फासाठी अशाप्रकारचे बॉक्स वापरले जाते. मात्र या वापरावर अद्याप कुणाचही आक्षेप आला नसल्याने अशा बॉक्सचा वापर सुरूच आहे. शहरात ठिकठिकाणी थर्माकोल बॉक्स वापरल्याचे दृष्टीस पडते़मासेवाल्यांना बंदीमुंबईत मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणात थर्माकोलचे बॉक्स वापरले जात होते. परंतु बंदीनंतर त्यांच्यावरही कारवाई करण्यास सुरुवात झाल्यामुळे त्यांनी प्लॅस्टिक बॉक्स वापरण्यास सुरुवात केलेली आहे. सदर बॉक्स हे पॅकिंगसाठीचे असल्यामुळे बाजारात दाखल होतात, परंतु आतील वस्तू काढल्यानंतर रिकामा झालेला हा बॉक्स बर्फ ठेवण्यासाठी वापरला जातो त्यामुळे अशा वापरावर बंदी असल्याने कारवाई केली जाते. मुंबईत सर्वात अगोदर अशा बॉक्सच्या वापराला बंदी करण्यात आलेली आहे.पॅकिंगसाठी थर्माकोल वापराला परवानगीवस्तुंच्या पॅकिंगसाठी थर्माकोलच्या वापरण्याला परवानगी आहे, मात्र सजावट साहित्य असलेल्य थर्माकोलच्या वापराला बंदी करण्यात आलेली आहे. औषधांचे पॅकिंग म्हणून आयताकृती बॉक्सचा वापर करण्यात येतो. परंतु हेच बॉक्स बर्फ ठेवण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी वापरणे नियमाबाह्य ठरते. या वस्तूचा वापरच करता येत नाही. असे असतानाही पॅकिंगसाठीच्या थर्माकोलचा वापर बर्फ ठेवण्यासाठी होत आहे.औषधांसाठीचे बॉक्सशहराला होलसेलमध्ये वैद्यकीय साहित्य आणि औषधांचा पुरवठा करणाºया एजन्सीकडे अशाप्रकारच्या थर्माकोल बॉक्समध्ये औषधांचे पॅकिंग येते. हे रिकामे बॉक्स दुकानदार घेऊन जातात आणित्याचा वापर ते बर्फ ठेवण्यासाठी केला जातो. वास्तविक हा ‘आइस बॉक्स’ नसून तो अन्य वस्तूंचा बॉक्स असतो. आइस बॉक्स हा प्लॅस्टिकचा असल्याने तो साधारणपणे तीन ते चार हजार रुपयांना मिळतो, तर थर्माकोलचा बॉक्सचा १०० ते २०० रुपयांचा सहज उपलब्ध होतो.
औषधांच्या थर्माकोल बॉक्सचा वापर बर्फासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:24 AM