नांदगाव : येथील व्ही.जे. हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे व ज्येष्ठ विधिज्ञ समीर जोशी उपस्थित होते.आठवडाभर सुरू असलेल्या विविध कला, क्रीडा, नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमात कबड्डी, खो-खो यासारखे विविध सांघिक, वैयक्तिक व मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्र मात विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकार सादर केले. अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे होते. याप्रसंगी श्रीकृष्ण रत्नपारखी, संकुलप्रमुख शशिकांत आंबेकर, विजय चोपडा उपस्थित होते.समीर जोशी यांनी शालेय जीवनात बक्षीस म्हणून मिळालेली पाच रु पयांची नोट २५ वर्षांपासून जपून ठेवली आहे. शालेय जीवनात मिळालेले ते बक्षीस माझ्या ध्येयपूर्तीतला एक मैलाचा दगड ठरले, असे त्यांनी सांगितले. डॉ. रोहन बोरसे यांनी, पुस्तकी ज्ञानाबरोबर आज चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविण्याची गरज आहे. याकडे शाळेबरोबरच पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे यांनी शाळेच्या विविध उपक्र माची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात संजीव धामणे यांनी, पिण्याच्या पाणी बचतीसाठी बंगलोरच्या गर्विता गुल्हाटी हिने अर्धा ग्लास पाणी प्लीज या मोहिमेतून निर्माण केलेल्या पाणीबचतीचा आदर्श याची माहिती दिली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.मुख्याध्यापक ठाकरे यांना राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीकृष्ण रत्नपारखी यांनी त्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन प्रियंका पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रवीण अहिरे यांनी करून दिला. आभार प्रकाश गरु ड यांनी मानले.याप्रसंगी पा. शि. संघ उपाध्यक्षा राजश्री करवा, पर्यवेक्षक प्रतिमा खैरनार, भैयासाहेब चव्हाण, भास्कर मधे आदींसह माजी शिक्षक व पालक उपस्थित होते.
व्ही. जे. हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:35 PM
नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे व ज्येष्ठ विधिज्ञ समीर जोशी उपस्थित होते.
ठळक मुद्देनांदगाव : विद्यार्थ्यांनी सादर केले सांस्कृतिक कार्यक्र म; सप्ताहाची सांगता