लासलगाव : येथील ग्रामीण रु ग्णालयात उत्तरीय तपासणी कक्ष, एक्स-रे टेक्निशियन तसेच आरोग्य कर्मचारी या सारख्या विविध विभागांमध्ये रिक्त पदे भरण्याबाबत तसेच खडकमाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुरासे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथील सुसज्ज अश्या ग्रामीण रु ग्णालयात दोनशेच्या आसपास गावांमधून रु ग्ण तपासणीसाठी येतात. शिवाय या परिसरात अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीची उत्तरीय तपासणी कक्ष नसल्याने त्या मृतदेहाची हेळसांड होते तसेच या ग्रामीण रु ग्णालयात एक्स-रे टेक्निशियन नसल्याने रु ग्णांची मोठया प्रमाणात हेळसांड होत आहे तसेच खडकमाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवकांच्या रिक्त जागा असून त्या भरण्याबाबत राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आपल्या स्तरावरून तातडीने आदेश करावे तसेच लासलगाव येथील ग्रामीण रु ग्णालया साठी उत्तरीय तपासणी केंद्रासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहेलासलगावसारख्या ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी येथील ग्रामीण रु ग्णालय केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र येथे अनेक पदे रिक्त असल्यामुळे रु ग्णसेवेवर अप्रत्यक्षरित्या त्याचा परिणाम होत आहे. या परिस्थितीचा विचार करून टोपे यांनी तातडीने या संदर्भात आदेश करावे अशी मागणी सुरासे यांनी केली आहे.
लासलगावच्या ग्रामीण रुग्णालयात पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 3:31 PM