शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

रिक्त पदांचे पारडे जड

By admin | Published: May 31, 2016 11:12 PM

महापालिका : ४० कर्मचाऱ्यांना निरोप, १५३१ पदे रिक्त, प्रशासनापुढे पेच

 नाशिक : आस्थापना खर्च ४२ टक्क्यांच्याही पुढे जाऊन पोहोचल्याने नव्याने नोकरभरती करता येत नाही आणि दुसरीकडे दर महिन्याला सेवेतून निवृत्त होणाऱ्यांच्या संख्येत मात्र भर पडत असल्याने महापालिकेला प्रशासकीय कामकाज चालविणे अवघड होऊन बसले आहे. मंगळवारी (दि.३१) महापालिकेतून तब्बल ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आल्याने रिक्त पदांचे पारडे जड होत चालले आहे. महापालिकेत आता मंजूर ७०९० पैकी १५३१ पदे रिक्त असून, वर्षभरात १११ कर्मचाऱ्यांना निरोप दिला जाणार आहे. महापालिकेत ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता, नगरसचिव, उपलेखापरीक्षक, उपलेखापाल, उद्यान निरीक्षक, नाट्यगृह सुपरवायझर यांच्यासह सहायक अधीक्षक दर्जाचे सहा अधिकारी तसेच कर्मचारी यांचा समावेश होता. यावर्षी निवृत्त होणाऱ्या १११ कर्मचाऱ्यांपैकी सर्वाधिक ४० कर्मचारी मंगळवारी (दि.३१) निवृत्त झाले. महापालिकेत मंजूर ७०९० पदे असून, त्यापैकी १५३१ पदे रिक्त झालेली आहेत. सद्यस्थितीत महापालिकेत ५४५९ पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. विभागनिहाय रिक्त पदे आणि कंसात मंजूर पदे पुढीलप्रमाणे, प्रशासन- ३०४ (१२६२), अभियांत्रिकी- ४५२ (१६४५), मोटार दुरुस्ती - ९६ (३५०), लेखाविभाग - ३३ (१०५), संगणक विभाग - ५ (५), अग्निशमन - ५९ (१८६), सुरक्षा - ७३ (२५६), उद्यान - ३१ (८१), जलतरण - १० (२५), कालिदास नाट्यगृह - ८ (१७), आरोग्य - ९१ (२१२४), वैद्यकीय - २६१ (७५४), मलेरिया - ३५ (९६), खतप्रकल्प - १८ (८५), शिक्षण विभाग कामाठी - १५ (९९). एकीकडे रिक्त होणाऱ्या पदांची संख्या वाढत असताना नव्याने नोकर भरतीला मात्र शासनाकडून मनाई आहे. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या कामकाज करणे अवघड होऊन बसले आहे. काही महत्त्वाच्या पदांवर सध्या प्रभारींकडे कार्यभार देण्यात आलेला आहे, तर निवृत्त कर्मचाऱ्यांना मानधनावर घेऊन त्यांच्याकडून कार्यभार उरकला जात आहे. नोकरभरती करायची असेल तर महापालिकेला आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या खाली आणावा लागणार आहे; परंतु दिवसेंदिवस आस्थापना खर्चात वाढच होत असल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.