नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानंतर नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानेही महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी प्राथमिक व माध्यमिक आस्थापनांवरील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या काळात शाळांना सुट्टी असली तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहील यासाठी व्हॉट्सअॅप, मॅसेजेस, ई-मेल्स, इंटरनेट, मोबाइल, फोन आदी माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांशी संपर्कात राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.राज्य सरकारने राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९८७ दि. १३ मार्च २०२० पासून लागू केल्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी, प्राथमिक व माध्यमिक शाळा यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक शहर परिसरातील महापालिके च्या ९० प्राथमिक व १३ माध्यमिक शाळांसह खासगी अनुदानित व विनाअनुदानित १७२ अशा एकूण २७५ शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. परंतु, या काळात शाळा बंद राहणार असल्या तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहील यादृष्टीने व्हॉट्सअॅप, मॅसेजेस, ई-मेल्स, इंटरनेट, मोबाइल, फोन आदी माध्यमातून पालकांशी व विद्यार्थ्यांशी संपर्कात राहण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शाळेतील शिपाई, कामाठी व सुरक्षारक्षक यांनी त्यांच्या वेळेत दररोज उपस्थित राहून नेमून देण्यात आलेले कामकाज करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून आदेशाच्या प्रतित्युतरादाखल उलट टपालाने यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाºयांनी शहरातील सर्व सरकारी, खासगी, प्राथमिक व माध्यमिक आस्थापनेवरील शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. दरम्यान, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद राहणार असल्या तरी दहावी व बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. या परीक्षेदरम्यान, आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.
सुट्टीच्या काळात व्हॉट्सअॅप, ई-मेल्सद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 9:36 PM
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी प्राथमिक व माध्यमिक आस्थापनांवरील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या काळात शाळांना सुट्टी असली तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहील यासाठी व्हॉट्सअॅप, मॅसेजेस, ई-मेल्स, इंटरनेट, मोबाइल, फोन आदी माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांशी संपर्कात राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केल्या आहेत.
ठळक मुद्देकोरोनामुळे शहरातील सर्व शाळा बंद शिपाई, कामाठी नियमित काम करण्याचे आदेश