मनमाड : करोना काळात सर्वांत पुढे राहून समाजाला सेवा देणाऱ्या व्यापारी वर्गाला फ्रंटलाइन वर्करच्या श्रेणीत धरून त्यांचे लवकरात लवकर लसीकरण एका वेगळ्या केंद्रावर करावे, अशा आशयाचे निवेदन व्यापारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र पारिक यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुहास कांदे यांना देण्यात आले. त्याबरोबरच मनमाडमधील रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे शनिवारचे लॉकडाऊन रद्द करण्यात यावे, शहरातील उद्योग धंदे वाढावे यासाठी एमआयडीसी सुरू करावी यासह अन्य मागण्या व्यापारी महासंघातर्फे करण्यात आल्या.
याप्रसंगी मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक, उपाध्यक्ष सुरेश लोढा, कुलदीपसिंग चोटमुरादी, मनोज जंगम, सचिव राजकमल पांडे, रईस फारुकी, गुरुदीपसिंह कांत, जुझर भारमल, मनोज आचेलिया, नीलेश व्यवहारे, शामकांत शिरोडे, दिपुशेठ चावला, कॅटचे प्रतिनिधी कल्पेश बेदमुथा, आदी उपस्थित होते.
--------------------------
फोटो: मनमाडला व्यापारी महासंघाच्या वतीने आमदार सुहास कांदे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक, सुरेश लोढा, कुलदीपसिंग चोटमुरादी, मनोज जंगम, राजकमल पांडे, रईस फारुकी, गुरुदीपसिंह कांत, जुझर भारमल आदी. (३० मनमाड)
300721\30nsk_25_30072021_13.jpg
३० मनमाड