सिन्नर तालुक्यात ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. तालुक्यातील दापूर, वावी, पांढुर्ली, देवपूर, नायगाव, ठाणगाव तसेच शहरामध्ये आर. एच. सिन्नर, आर. एच. सिन्नर १, यूपीएचसी शिवाजीनगर, नगरपालिका दवाखाना, तसेच आर. एच. दोडी या ११ ठिकाणी लसीकरणाचे काम सुरू आहे. दररोज प्रत्येक केंद्रावर सरासरी १०० ज्येष्ठांना लस देण्यात येत आहे. शहरातील शिवाजीनगर लसीकरण केंद्रावर आजवर ९८८ ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती औषधनिर्माण अधिकारी जयश्री लांडगे यांनी दिली आहे. या केंद्रावर दररोज १५० ते २०० नागरिकांना लस दिली जात आहे. यासाठी प्रभाग क्रमांक १२ मधील नगरसेवक पंकज मोरे यांच्यासह आरोग्यसेविका दीपाली केदार, संगीता शिंदे व महेश पगार आदी परिश्रम घेत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत आहे.
सिन्नर तालुक्यात ११ केंद्रांतून ११ हजार ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:13 AM