पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सुरुवातीला फक्त शंभर लस मिळत असल्याने नागरिकांची गैरसोय होईल म्हणून लसीकरणाची तारीख वाढविण्यात आली. १६ तारखेला सुमारे २०० लसींची उपलब्धता झाल्याने सकाळी १० वाजेपासून सामनगावच्या प्राथमिक शाळेत कोरोना लसीकरणासाठी लागणारी कोविशिल्ड लस ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी ग्रामसेवक बापू पवार, लकी ढोकणे, शिवाजी जगताप, योगेश जगताप, सुभाष जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योगीता वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक सतीश आहिरराव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.किरण गायकवाड, आरोग्यसेविका वनिता देशपांडे, आरोग्य सेवक राहुल पैठणे, योगेश मते यांच्यासह आशा सेविकांनी लसीकरण मोहीम राबविली.
(फोटो १६ लस)