येवला : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रास्ते सुरेगाव येथे भारम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना तपासणी व लसीकरण मोहीम राबविण्यात आली.रास्ते सुरेगाव येथील मराठी शाळेत मोहिमेचा प्रारंभ सरपंच वंदना डमाळे यांच्या हस्ते करण्यात आला. मोहिमेत डॉ. सुशांत पाटील, ग्रामसेवक जयश्री सावळा, डॉ. नागरे, डोंगरे, सुरेखा गायकवाड, मीना चव्हाण, मनीषा कदम, आशा बनकर, शिंदे यांच्या पथकाने ३६ जणांच्या चाचण्या तर शंभर नागरिकांना लसीकरण केले. त्यांना ज्ञानेश्वर धुमाळ, प्रथमेश पगारे, बाबासाहेब पगारे, संदीप मोरे, नंदू ढमाले, अकबर पठाण, संतोष आहेर, नवनाथ आहेर, राजू पठाण, योगेश ढमाले आदींनी मदत केली.बाबा डमाळे पाटील यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने सदर मोहिमेचे आयोजन केले होते. यात ४५ वर्षे पुढील नागरिकांची मोफत कोरोना चाचणी व लसीकरणाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटासाठीही अशीच मोहीम लवकरच राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.(२८ येवला)
रास्ते सुरेगावला लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 9:33 PM
येवला : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रास्ते सुरेगाव येथे भारम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना तपासणी व लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
ठळक मुद्देरास्ते सुरेगाव येथील मराठी शाळेत मोहिमेचा प्रारंभ