उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील कोरोना संसर्ग कमी होत असून, तिसऱ्या लाटेला रोखण्याची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे ही तयारी सुरू असली तरी लसीकरण हा त्यातीलच उपाययोजनेचा भाग असतानाही ते अपेक्षित प्रमाणात झालेले नाही. ४५ वर्षांपुढील वयोगटातील ६४ लाख ७१ हजार २०८ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आरोग्य विभागाकडे होते. त्यापैकी नाशिक जिल्ह्यात २१ लाख ८६ हजार ६९७ नागरिकांपैकी सहा लाख ५५ हजार १०० म्हणजेच २९.९६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील १४ लाख ३९ हजार २८५ पैकी तीन लाख ८३ हजार ७१३ नागरिकांचे लसीकरण झाले झाले असून, उद्दिष्टाच्या तुलनेत २६.६६ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. धुळे जिल्ह्यात सात लाख २२ हजार ८१५ नागरिकांपैकी दोन लाख दहा हजार ९३७ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. म्हणजेच २९.१८ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात सहा लाख १३ हजारांपैकी दोन लाख १४ हजार १०४ नागरिकांचे लसीकरण झाले असून, उद्दिष्टांपैकी ३५.६८ टक्के उद्दिष्टप्राप्ती झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात १५ लाख २२ हजार ३९९ नागरिकांपैकी चार लाख ५९ हजार ११५ म्हणजेच ३०.१६ टक्के लसीकरण झाले आहे.
इन्फो..
उत्तर महाराष्ट्रात सध्या तीन लाख दोन हजार ७८४ डोस शिल्लक आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात एक लाख ३५ हजार १६५, नंदुरबार एक लाख नऊ हजार ६९८, जळगाव तीन हजार १९४, धुळे ५३ हजार १६८, तर अहमदनगर जिल्ह्यात ९१ हजार ५६७ डोस शिल्लक आहेत.