मालेगाव : येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक (म्युनिसिपल हायस्कूल) विद्यालयात प्राचार्या कल्पना देसले यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड-१९ च्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले.
शालेय शिक्षण विभागाच्या आदेशान्वये समाजश्री प्रशांतदादा हिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात निमा आरोग्य विभाग, मालेगाव महानगरपालिका यांच्या सहकार्याने १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
आरोग्य विभागातील आरोग्य सेविका माया पाटील, आशा सेविका श्रीमती गवांदे व नरगीस लसीकरणासाठी आले होते. एका बाकावर एक विद्यार्थी असे नियोजन करून लसीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना विद्यालयात लसीकरण केल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक नितीन सोनवणे, वरिष्ठ लिपिक निंबा पवार, ग्रंथपाल मच्छिंद्र भदाणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.