वैद्यकीय अधिकारी, नर्स, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचा पहिल्या टप्प्यात समावेश असणार आहे. तालुक्याच्या पश्चिम, पूर्व व मध्य भागात लसीकरण केंद्र करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र निश्चितीकरण करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाची तयारी सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात दीड हजार आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 6:01 PM