५० हजार लस उपलब्ध : चिकागो व्हायरसचा प्रादुर्भावनाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, तो रोखण्यासाठी व्यापक प्रयत्नांना सुरुवात झाली असून, स्वाइन फ्लू झाल्यास त्यासाठी लागणाºया टॉमी फ्लूचा मुबलक साठा जिल्ह्यात उपलब्ध असला तरी, सध्या ‘चिकागो’ व्हायरस मोठ्या प्रमाणात हवेत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी नवीन लस येत्या आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव सर्वाधिक गरोदर महिला, मधुमेही व उच्चरक्तदाब असणाºयांवर होतो. सध्याचा स्वाइन फ्लूमध्ये ‘चिकागो’ व्हायरस हा नव्याने विषाणू आढळून आला असून, त्यासाठी स्वाइन फ्लूच्या नियमित औषधांचा फारसा उपयोग होत नसल्याने त्यावर हाफकीन इन्स्टिट्यूटने लस शोधून काढली आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला सदरची लस घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीकडे असलेल्या काही निधीतूनही या लसी खरेदी करण्यात येतील तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सीएसआरमधून सुमारे ५० हजार लसी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या लसीची किंमत पाचशे रुपये इतकी असून, राज्य सरकारला तीनशे रुपयांत मिळेल. त्यामुळे ही लस प्राप्त झाल्यास सर्वप्रथम गरोदर मातांना त्याचे स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लस उपलब्ध झाल्यास रुग्णांना त्या देण्यात येतील, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.नाशिक, पुणे, कोल्हापूर या भागातील हवामान सध्या रोगांना प्रोत्साहित करणारे आहे. त्यामुळे या भागात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झपाट्याने होऊन मृतांची संख्याही वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत खबरदारी घेणे महत्त्वाचे असून, सध्या सणासुदीचे दिवस असल्याने गर्दी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्य तितकी काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले. हाफकीन इन्स्टिट्यूटने शोधलेली लस प्राप्त झाल्यास सर्वप्रथम गरोदर मातांना त्याचे स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लस उपलब्ध झाल्यास रुग्णांना त्या देण्यात येतील.
स्वाइन फ्लू रोखण्यासाठी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 1:08 AM