नाशिक : नव्या बिटको रुग्णालयात कोरोना- बाधितांवर उपचार होत असल्याने येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद केले आहे. त्याऐवजी जुन्या बिटको रुग्णालयात लसीकरण सुरू केले आहे. जुने बिटको रुग्णालय तसेच गोरेवाडी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सिन्नर फाटा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दसक पंचक शहरी आरोग्य केंद्र, खोले मळा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीदेखील लसीकरण सुरू करण्यात आले आहे, असे आयुक्त कैलास जाधव यांनी कळविले आहे.
बिटको रुग्णालयात लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 12:46 AM