जानोरी : दिंडोरी तालुक्यातील मोहाडी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रावर ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मोहाडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी छगन लोणे यांनी दिली.सध्या मोहाडी आरोग्य केंद्रात १८ वर्षे ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना नोंदणीनुसार लसीकरण सुरू असून ते यापुढे नियमित चालू राहणार आहे. तसेच ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण उपकेंद्रावर लसीच्या मिळणाऱ्या साठ्यानुसार सुरू राहणार आहे.दिंडोरी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून लसीचा कमी प्रमाणात साठा येत असल्याने लसीकरणात मोठी अडचण येत होती. याबाबत मोहाडी येथील केंद्रात रुग्ण कल्याण समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली असून त्यात केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात लस पुरविण्यात यावी असे ठरले. यावेळी परिसरातील गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सध्या शासनाकडून जसा लसीचा पुरवठा होईल तसे लसीकरण करण्यात येत आहे त्यामुळे ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना उपकेंद्रातच लसीकरण केले जाईल १८ ते ४४ वर्षांपुढील नागरिकांना नियमित नोंदणीकरणानुसार लसीकरण चालू राहील.- डॉ. छगन लोणे, आरोग्य आधिकारी, मोहाडी.
मोहाडीत प्रत्येक केंद्रावर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 8:49 PM
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील मोहाडी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रावर ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मोहाडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी छगन लोणे यांनी दिली.
ठळक मुद्दे पंधरा दिवसापासून लसीचा कमी प्रमाणात साठा