पाडळदे : कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा तुटवडा असल्यामुळे आसपासच्या खेड्यातील लोकांना विनालस घेता वापस जावे लागत आहे.
शासनाच्या आदेशानुसार १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस पुरवली जाईल, परंतु येथे ४५ वर्ष वयावरील लोकांनासुद्धा लस मिळेनाशी झाली आहे. सध्या फक्त ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांच्यासाठीच लस उपलब्ध आहे. ज्यांना अजून पहिला डोस मिळाला नाही असे सर्व नागरिक लस घेण्यापासून वंचित आहे.
पाडळदे शेरूळ हिसवाळ देवघट चिंचगव्हाण साकुर दहिवाळ आसपास खेड्यातील लोकांना लस उपलब्ध होत नाही. नागरिकांना कुठल्याही प्रकारची सूचना मिळत नाही व कळवा येथे हेलपाटे मारावे लागत आहे त्यादृष्टीने आरोग्य केंद्रांनी लक्ष पुरवून आसपासच्या खेड्यातील लोकांना नुकताच लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.