नाशिक : इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे (आयसीएआय) जून महिन्यात घेण्यात आलेल्या सीएसीपीटी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.१८) जाहीर करण्यात आले असून, या परीक्षेत नाशिक मधून वैभव कुटे यांने सर्वाधिक १९० गुणांसह यश संपादन केले आहे, तर अन्य विद्यार्थ्यांनीही चमकदार कामगिरी करीत या परीक्षेत यश मिळविले आहे.इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियाच्या नाशिक शाखेतर्फे मिळालेल्या माहितीनुसार आयसीएआय राष्ट्रीय स्तरावर निकाल जाहीर केला आहे. या निकलातून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिकमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत चांगले यश संपादन केले असून, नाशिकमधून वैभव कुटे यांने दोनशेपैकी १९० गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून, त्याला गणित-५० पैकी ५०, अकाउंट्समध्ये ६० पैकी ५५ अर्थशास्त्रात ५० पैकी ४८ कायदेविषयात ४० पैकी ३७ गुण मिळाले आहेत. त्याचप्रमाणे शेफाली भेरुलाल माहेश्वरीला दोनशैपैकी १६५ गुण मिळाले असून ईशा जोशी हिला १५६ सलील मणियार १५०, आदित्य रनाळकरला १२३ गुणांसह यश मिळाले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांना आयसीएआयच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. संपूर्ण देशभरातून २० हजार ३०३ विद्यार्थ्यांनी सीपीटीची परीक्षा दिली होती. त्यातील ५ हजार ७६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यावर्षीचा सीपीटी निकाल एकूण २८.३९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ३ हजार ३४८ म्हणजेच २८.९० टक्के मुले, २ हजार ४१६ म्हणजेच २७.७२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना नाशिक सीए शाखेचे अध्यक्ष सीए हर्षल सुराणा व सचिव राजेंद्र शेटे यांचे मार्गदर्शन लाभले.
सीए सीपीटीमध्ये वैभव कुटे अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:35 AM
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे (आयसीएआय) जून महिन्यात घेण्यात आलेल्या सीएसीपीटी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.१८) जाहीर करण्यात आले असून, या परीक्षेत नाशिक मधून वैभव कुटे यांने सर्वाधिक १९० गुणांसह यश संपादन केले आहे
ठळक मुद्देनिकाल जाहीर : नाशिकच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी