ठेंगोडा : बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी त्यांच्या स्थानिक विकासनिधीतून दिलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. यावेळी ठेंगोड्याच्या सरपंच चिंधाबाई पगारे यांच्याकडे ग्रामपंचायतसाठी वैकुंठरथ सुपूर्द करण्यात आला.ठेंगोडा गावाची लोकसंख्या व क्षेत्रफळ मोठे असल्याने गाव व वस्त्यांवर अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंतचा प्रवास करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. जीवनातील शेवटची यात्रा सुखकर व्हावी यासाठी माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांचा निधी वैकुंठरथासाठी उपलब्ध करून दिला होता. त्या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, विजय वाघ, वंदना भामरे, सुरेखा बच्छाव, उपसरपंच नारायण निकम, प्रदीप शेवाळे, वसंत शिंदे, मधुकर व्यवहारे, अंजनाबाई मोरे, रवींद्र मोरे, दौलत अहिरे, आण्णा पगारे, भरत धनवटे, शांताराम वाघ, तुळशीदास शिंदे, विवेक सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
वैकुंठरथ लोकार्पण : ग्रामपंचायतीकडे वाहन सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 9:56 PM
ठेंगोडा : बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी त्यांच्या स्थानिक विकासनिधीतून दिलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. यावेळी ठेंगोड्याच्या सरपंच चिंधाबाई पगारे यांच्याकडे ग्रामपंचायतसाठी वैकुंठरथ सुपूर्द करण्यात आला.
ठळक मुद्देआमदार दीपिका चव्हाण यांच्या निधीतून वैकुंठ रथ.