नाशिक : दीपावलीच्या उत्सवी आणि आनंदमयी वातावरणात सूरविश्वासची मैफल रसिकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करून गेली. पंडित शंकरराव वैरागकर यांच्या स्वरातून निथळणारे ‘चांदणे सोबत घेऊन’ या पर्वाची आठवण सर्वांनी जपून ठेवली.कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने डिझास्टर मॅनेजमेंट हब,सावरकरनगर, येथे सुरविश्वास या कार्यक्र माचे नववे पुष्प शनिवारी (दि.२६) पंडित वैरागकर यांनी गुंफले. मैफलीची सुरु वात रागभैरव रागाने केली विलंबित बडा ख्यालचे शब्द होते, ‘ बलमवा मोरे सैय्या ’, त्यानंतर छोटा ख्याल सादर केला. एक तालात हर हर महादेव यातून परमेश्वराची आराधना करत भावभक्तीचे दर्शन घडले. यानंतर ठुमरी सादर केली. मैफलीचा समारोप वैकुंठीचा राया या भैरवीने झाला. ओंकार वैरागकर (तबला), सागर कुलकर्णी (संवादिनी), अथर्व वैरागकर, ईश्वरी वैरागकर (स्वरसाथ) प्रसाद शेळके (पखवाज) अन्नपूर्णा सौंदाने (टाळ) यांनी साथसंगत केली कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्यात अॅड. अविनाश भिडे, कवी संजय चौधरी, तन्वी अमित यांचा सन्माने करण्यात आला. कलावंतांचा सन्मान रमेश देशमुख, डॉ. मनोज शिंपी, सतीश गायधनी, शिल्पा कवीश्वर विनायक देवधर, मिलिंद धटिंगण, माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्र माचे आयोजक विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर, विनायक रानडे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैरागकर यांच्या स्वरातून निथळले भावभक्तीचे चांदणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:19 AM